महिला योद्धयांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:10 AM2021-03-10T04:10:58+5:302021-03-10T04:10:58+5:30

धायरी येथील सावित्री गार्डन मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या सन्मान सोहळ्यात महिलांना शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात ...

Honoring women warriors | महिला योद्धयांचा सन्मान

महिला योद्धयांचा सन्मान

Next

धायरी येथील सावित्री गार्डन मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या सन्मान सोहळ्यात महिलांना शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास राष्ट्र्वादी काँग्रेस पार्टीचे खडकवासला विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष काकासाहेब चव्हाण, धायरी गावच्या माजी सरपंच आशा बेनकर, सिल्वर बीच मल्टिस्पेशल हॉस्पिटलच्या व्यवस्थापिका डॉ. रश्मी पाटील, ससून रुग्णालयातील अधिकारी केतकी पांडे, आशावर्कर मेघा प्रमोद बरसिले, वस्ताद हरिभाऊ दादा पोकळे शाळेच्या मुख्यधिपिका नीता गणपत मणूकर, पालिकेच्या स्वच्छता कर्मचारी अनिता महेश जाधव, अंगणवाडी सेविका वंदना मुकुंद महामुनी आणि सिंहगड पोलीस ठाण्याच्या महिला कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन सुमित बेनकर यांनी केले. कोरोना काळात महिलांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत कोरोनापासून बचाव करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य असल्याचे धायरी गावच्या माजी सरपंच आशा बेनकर यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन बेनकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सायली साबळे यांनी केले.

फोटो ओळ : जागतिक महिला दिनानिमित्त शिवशंकर मित्र मंडळाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला.

Web Title: Honoring women warriors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.