मराठी व्याकरण ऑलम्पियाड स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:12 AM2021-03-26T04:12:35+5:302021-03-26T04:12:35+5:30
परीक्षेत उत्तम यश संपादन केल्याने संस्थेचे मुख्य सचिव मुकुंद शहा यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. इंदापूर शहरातील ...
परीक्षेत उत्तम यश संपादन केल्याने संस्थेचे मुख्य सचिव मुकुंद शहा यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
इंदापूर शहरातील श्री. नारायणदास रामदास प्राथमिक विद्यामंदिर येथे गुरुवारी (दि. २४) कार्यक्रम पार पडला. या वेळी संस्थेचे मुख्य सचिव मुकुंद शहा व श्री. नारायणदास रामदास इंग्लिश मीडियम मुख्याध्यापिका फैजिया शेख यांच्या हस्ते उपस्थितीत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
राज्यभरातून लाखो विद्यार्थी व शाळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. यामध्ये इंदापूरच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये इयत्ता पहिलीच्या श्रावणी संजय गावडे हिने प्रथम क्रमांक मिळविले, तर मयुरेश अतुल शिंदे व प्रांजली गोकुळ हिप्परकर यांनी द्वितीय क्रमांक, तर जुवेरीया अख्तर शेख हिला तृतीय क्रमांक मिळाला.
इयत्ता दुसरीमधील प्रेरणा सुधाकर झाडे प्रथम क्रमांक, ओम अतुल साळुंके द्वितीय क्रमांक, कार्तिक गोकुळ हिप्परकर तृतीय क्रमांक आणि इयत्ता तिसरीमधील आदिती सचिन जगताप तृतीय क्रमांक, तर इयत्ता चौथीमधील विनय अशोक कचरे याला द्वितीय क्रमांक मिळाला. यांचा सन्मान करण्यात आला.
या वेळी राज्यस्तरीय माय मराठी व्याकरण ऑलिम्पियाड स्पर्धेचे संयोजक सुनील नगरे, संतोष भांडवलकर, रणजित खंडागळे यांनी श्री. नारायणदास रामदास प्राथमिक विद्यामंदिर प्रशालेस आदर्श उपक्रमशील शाळा म्हणून पुरस्कार प्रदान केला. तर प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुप्रिया आगरखेड यांना आदर्श क्रियाशील शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
२५ इंदापूर
यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करताना इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा व मान्यवर.