गुंडांनी हिशोबात राहावे; अन्यथा आमच्याशी गाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:20 AM2021-02-18T04:20:58+5:302021-02-18T04:20:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “गुंडांनी लक्ष्मणरेषेच्या आतच राहावे. सार्वजनिक ठिकाणी दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला, कायदा व्यवस्थेवर परिणाम झाला ...

Hooligans should be held accountable; Otherwise tie up with us | गुंडांनी हिशोबात राहावे; अन्यथा आमच्याशी गाठ

गुंडांनी हिशोबात राहावे; अन्यथा आमच्याशी गाठ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “गुंडांनी लक्ष्मणरेषेच्या आतच राहावे. सार्वजनिक ठिकाणी दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला, कायदा व्यवस्थेवर परिणाम झाला तर त्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल,” असा इशारा पोलीस पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला. आजची कारवाई ही तर केवळ सुरुवात आहे. पुणेकरांच्या सुरक्षेची जबाबदारी आमच्यावर आहे. कायदा सुव्यवस्थेला धक्का लावणाऱ्यांवर काय कारवाई होईल, हे येत्या काही दिवसांत दिसेलच, या शब्दांत गुप्ता यांनी दरडावले.

गुंड गजानन मारणे तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर त्याच्या समर्थकांनी शेकडो मोटारींसह तळोजा ते पुण्यापर्यंत जंगी मिरवणूक काढली होती. कोथरुडमधील पौड रस्त्यावरील शास्त्रीनगर येथे शेकडो समर्थकांसह त्याने गणपती मंदिरात आरती केली. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. न्यायालयाने बुधवारी (दि. १७) त्याची जामिनावर सुटका केली.

याबाबत गुप्ता यांनी सांगितले की, हा सर्व प्रकार खूप वाईट झाला. अनेक तरुणांनी मोबाईलवर त्याचे ‘स्टेटस’ ठेवल्याचे समजले. व्यक्तीश: आपल्याला या सर्व प्रकाराबाबत वाईट वाटले. पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत (क्राईम मीटिंग) याच विषयावर अधिक चर्चा झाली. गुंडांकडून शहरात अशा प्रकारे दहशतीचे वातावरण पोलीस कधीच खपवून घेणार नाही. गुन्हेगारी टोळ्यांमधील काही म्होरके तुरुंगातून सुटले तरी त्यांनी शहराच्या सुरक्षेत बाधा आणली तर त्यांच्यावर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.

गेल्या काही दिवसांत अनेक गुंडांवर मोक्का तसेच अन्य कडक कलमांद्वारे कारवाई करुन त्यांची गुंडगिरी मोडून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुणेकर आणि शहराच्या सुरक्षित वातावरणात कोणी बाधा आणणार असेल तर त्यांची गय केली जाणार नाही. आम्ही केलेली कारवाई ही केवळ सुरुवात आहे. येत्या काही दिवसांत अशी दहशत पसरविणाऱ्यांचे काय होते ते पाहा, अशी तंबी गुप्ता यांनी दिली.

Web Title: Hooligans should be held accountable; Otherwise tie up with us

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.