खेड तालुक्याला विमानतळ परतण्याची आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:12 AM2021-01-25T04:12:25+5:302021-01-25T04:12:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिक्रापूर : जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागलेले राजकीय, शासकीय ग्रहण अद्यापही सुरूच आहे. सुरुवातीला खेड भागात होणारे ...

Hope to return to Khed taluka airport | खेड तालुक्याला विमानतळ परतण्याची आशा

खेड तालुक्याला विमानतळ परतण्याची आशा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

शिक्रापूर : जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागलेले राजकीय, शासकीय ग्रहण अद्यापही सुरूच आहे. सुरुवातीला खेड भागात होणारे हे विमानतळ पुरंदर भागात गेल्यानंतर तेथील विरोधामुळे पुन्हा एकदा खेड भागात येईल, अशा आशा पल्लवीत झाल्या आहेत.

विमानतळाला पूरक व महत्त्वाची दळणवळण सुविधाची मुख्य गरज असलेल्या पुणे जिल्ह्यात महत्त्वाचे असलेले आशिया खंडातील रांजणगाव एमआयडीसी शिक्रापूर, सणसवाडी, चाकण, खेड, भोसरी एमआयडीसी त्याचबरोबर नगर, नाशिक व मुंबई या सर्व भागाला मध्यवर्ती ठिकाण म्हणून खेड विमानतळाची जागा सुरुवातीला पाहण्यात आली होती. काही तांत्रिक अडचणीमुळे विमानतळ पुरंदरला नेण्यात आले. परंतु हे विमानतळ खेड भागातच व्हावे यासाठी पुन्हा मागणीने जोर धरला आहे.

औद्योगिक पट्याला गरज असलेले व दळणवळणची योग्य दिशा असल्याने या भागातच विमानतळ योग्य असल्याचे अनेक जाणकारांचे मत असले तरी तांत्रिक बाबींच्या सर्वेक्षणानंतर विमानतळ याची दिशा बदलण्यात आली होती. नुकतेच खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी एका कार्यक्रमात या भागात विमानतळ व्हावे यासाठी मागणी केली असून, या भागातील शेतकऱ्यांचा विरोधदेखील काहीसा कमी झाला असल्याने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय विमानतळ खेड भागात होईल, अशी अपेक्षा या भागातून व्यक्त होत आहे.

२०१७ मध्ये खेड व पुरंदरमधील विमानतळाबाबत संभ्रम निर्माण होऊन दोन्ही भागांत मोठ्या प्रमाणावर आंदोलने झाली होती. आजही पुरंदर भागात विमानतळाला काहीसा मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. खेड भागातील एसईझेडच्या दुसऱ्या टप्प्यातील जमीन संपादन प्रक्रिया विरोधानंतर बंद करण्यात आली. परंतु अजूनही काही भागातील भूसंपादनाचे सातबारावरील शिक्के काढलेले नाहीत. सध्या खेड सेझ प्रकल्पाला घरघर लागल्यानंतर विमानतळाला असलेला विरोध काहीसा कमी झाला आहे. मागील दहा ते बारा वर्षांत या भागाला वरदान ठरणारे विमानतळ तसेच पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प होण्याच्या आशेने या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण वाढले. त्याचबरोबर औद्योगिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर झाली. सध्या रेल्वे प्रकल्प काहीसा मार्गी लागत आहे. विमानतळ अद्याप निश्चित नसल्याने या भागातील गुंतवणूक केलेल्या अनेक उद्योजकांनी धीम्या गतीने आपले काम चालू केले होते. २०१५ मध्ये खेड भागात विमानतळ होणाऱ म्हणून अनेक छोट्या-मोठ्या गुंतवणूकदारांनी या भागात जमिनी विकत घेतले असून कोट्यावधी रुपये या भागात गुंतवले आहेत. त्यानंतर विमानतळाची दिशा बदलल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले होते. पुन्हा एकदा विमानतळ या भागात येईल, अशी अशा नागरिक व्यक्त करत आहेत.

चौकट

सर्वात सुरवातीला २०१४ -१५ मध्ये चाकणजवळील सातगाव भागात विमानतळही सर्वेक्षण झाले. त्यानंतर सप्टेंबर २०१५ मध्ये महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळाने चाकणऐवजी दुसरी जागा शोधण्याच्या सूचना केली. केंदूर, निमगाव, दावडी, कनेरसर या भागांतील काही जागा आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सर्व्हे करण्यात आला होता. सध्या या भागातील विमानतळाचा विरोध काहीसा संपला असून या भागात विमानतळ व्हावे, अशी अपेक्षा आता नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Web Title: Hope to return to Khed taluka airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.