घोड धरण ९५ टक्के भरले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 03:02 AM2018-08-23T03:02:04+5:302018-08-23T03:02:33+5:30

घोड नदीवर असणाऱ्या घोड धरणाची पाणी साठवणक्षमता ७ हजार ६३९ दलघफू आहे

Horse dams are filled up to 95 percent | घोड धरण ९५ टक्के भरले

घोड धरण ९५ टक्के भरले

googlenewsNext

निमोणे : चिंचणी (ता. शिरूर) येथील घोड धरण ९५.५१ टक्के भरल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याची माहिती मुख्य अभियंता प्रकाश लंकेश्वर यांनी दिली.
चिंचणी (ता. शिरूर) येथील घोड नदीवर असणाऱ्या घोड धरणाची पाणी साठवणक्षमता ७ हजार ६३९ दलघफू आहे. तर, मृत पाणीसाठा २ हजार १७२ दलघफू आहे. उपयुक्त पाणीसाठा ५ हजार ४६७ दलघफू एवढा आहे. तीन दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संतत पाऊस पडल्याने या धरणसाखळीतील डिंभे, वडज, येडगाव ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली. त्यातून ८,५०० क्युसेक्स वेगाने पाणी घोड नदीपात्रात सोडण्यात आले. त्यामुळे धरणात ९५.५१ टक्के पाणीसाठा झाला आहे. पूरनियंत्रणाच्या दृष्टीने आज सकाळी ९ वाजता २ हजार २८०, दुपारी १२.३० वाजता ६ हजार ९६० तर सायंकाळी १० हजार ४४० क्युसेक्स इतक्या वेगाने घोड धरणातून पाण्याचा विसर्ग होत आहे. याचे नियमन करण्यासाठी कर्मचारी दिवसरात्र तैनात असून अधिकारीही ठाण मांडून आहेत. दरम्यान, याच धरणालगत असलेल्या पुलाला तडे गेल्याने पुलाची सुरक्षा धोक्यात आली आहे. खात्याच्या वतीने या पुलाची त्वरित दुरुस्ती व्हावी, अशी ग्रामस्थांनी पत्राद्वारे केली आहे. पुलाच्या डागडुजीचे काम त्वरित करून घेऊ, असे शाखा अभियंता प्रकाश लंकेश्वर यांनी सांगितले.

उजनी भरले ७२ टक्के
उजनीवर पुणे जिल्ह्यातील इंदापूर, दौंड, नगर जिल्ह्यातील कर्जत, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुक्यांतील शेती, साखर कारखाने, औद्योगिक वसाहती अवलंबून आहेत; तसेच सोलापूर महानगरपालिका यांचा पाणीपुरवठाही उजनी जलाशयातून होतो. पुणे शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने सर्वच धरणांतून उजनी धरणात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे उजनीच्या पाणीपातळीत वाढ होत असून शेतकरी खूष आहे.
बुधवारी दुपारपर्यंत उजनी धरणात दौंड येथून ६० हजार ५०० क्युसेक, तर बंडगार्डन येथून ३४ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. बुधवारी दुपारपासून पाण्याचा विसर्ग वाढत आहे. दरम्यान, उजनी धरण व्यवस्थापन उपविभाग भीमानगर यांनी एक परिपत्रक काढून भीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सध्या उजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा येत आहे. उपयुक्त साठा ९० टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता असल्याने या परिस्थितीत पूर नियंत्रणाच्या दृष्टीने भीमा नदीपात्रात पाणी सोडले जाऊ शकते.

Web Title: Horse dams are filled up to 95 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.