इन्डूरन्स चॅम्पियनशिप स्पर्धेत हाॅर्स रायडर्स नेट लोणावला क्लबला घवघवीत यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 15:31 IST2018-02-02T15:30:01+5:302018-02-02T15:31:01+5:30
इंडिजिनियस हाॅर्स ओनर्स असोसिएशन यांच्या वतीने लोणावळ्यात आयोजित करण्यात आलेल्या इन्डूरन्स चॅम्पियनशिप या हाॅर्स रायडिंग स्पर्धेत हाॅर्स रायडर्स नेट लोणावळा क्लबने घवघवीत यश संपादित करत तब्बल पाच सुर्वण, दोन रौप्य व पाच कांस्य पदके मिळवली.

इन्डूरन्स चॅम्पियनशिप स्पर्धेत हाॅर्स रायडर्स नेट लोणावला क्लबला घवघवीत यश
लोणावळा : इंडिजिनियस हाॅर्स ओनर्स असोसिएशन यांच्या वतीने लोणावळ्यात आयोजित करण्यात आलेल्या इन्डूरन्स चॅम्पियनशिप या हाॅर्स रायडिंग स्पर्धेत हाॅर्स रायडर्स नेट लोणावळा क्लबने घवघवीत यश संपादित करत तब्बल पाच सुर्वण, दोन रौप्य व पाच कांस्य पदके मिळवली. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेली पोलंड येथील नऊ वर्षीय यहाना व 68 वर्षाचे अजय शहा हे खेळाडू लक्षवेधी ठरले.
इंडिजिनियस असोसिएशनच्या वतीनेे दरवर्षी वेगवेगळ्या भागात हाॅर्स रायडिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. नुकतीच लोणावळ्यात ही स्पर्धा 20,40 व 60 किमी या तिन गटात घेण्यात आली. देशभरातील खेळाडू व परदेशी खेळाडू अशा 50 स्पर्धकांनी य स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. 14 वर्षाखालील वयोगटाच्या 20 किमी अंतराच्या स्पर्धेत लोणावळा नेट क्लबच्या हर्षल खळदकर याने सुर्वण पदक तर सुजल जाधव याने रौप्य व तन्मय वांद्रे याने कांस्य पदकाची कामगिरी केली. तसेच अनुराग गायकवाड याने स्टेबल मेट या वर्गात सुर्वण पदक प्राप्त केले, टीम कॅटेगिरीमध्ये हाॅर्स रायडर्स नेटच्या दोन्ही संघांनी सुर्वण व रौप्य पदकं मिळवली.
या क्रिडा स्पर्धांमुळे मुलांच्या शारिरिक, मानसिक व व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत होते असे मत हाॅर्स रायडर्स नेट क्लबचे संयोजक अॅड. संजय वांद्रे यांनी व्यक्त केले.
कसा घोषीत होतो विजेता -
ही स्पर्धा म्हणजे ठरवून दिलेल्या वेळेमध्ये स्पर्धकाने स्पर्धा पुर्ण करावी लागते तसेच घोड्याला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घ्यावी लागते, स्पर्धा संपल्यानंतर घोड्याच्या हदयाचे ठोके तपासून स्पर्धकाने यशस्वी रित्या स्पर्धा पुर्ण केल्याचे घोषित केले जाते.