इंदापुरात चाऱ्यासाठी घोड्यांचा 'वारू मोर्चा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:09 AM2021-05-31T04:09:26+5:302021-05-31T04:09:26+5:30

दरम्यान, कोरोनामुळे शासनाने राज्यात लॉकडाऊन लावलेले आहे. मागील दीड वर्षापासून लॉकडाऊन असल्याने घोडे व्यावसायिक यांचा व्यवसाय बंद आहे. त्यामुळे ...

Horse 'Waru Morcha' for fodder in Indapur | इंदापुरात चाऱ्यासाठी घोड्यांचा 'वारू मोर्चा'

इंदापुरात चाऱ्यासाठी घोड्यांचा 'वारू मोर्चा'

Next

दरम्यान, कोरोनामुळे शासनाने राज्यात लॉकडाऊन लावलेले आहे. मागील दीड वर्षापासून लॉकडाऊन असल्याने घोडे व्यावसायिक यांचा व्यवसाय बंद आहे. त्यामुळे शासनाने घोडे व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक मदत घ्यावी, अशी मागणी इंदापूर तालुक्यातील घोडे व्यवसायिकांनी शासनाकडे केली आहे.

याबाबत इंदापूर येथे महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्यांचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन पीआरपीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली घोडे व्यावसायिकांनी निवेदन दिले.

या वेळी बोलताना पीआरपीचे संजय सोनवणे म्हणाले की, राज्यातील घोडे व्यावसायिकांची व घोड्यांची लॉकडाऊनमुळे मोठी उपासमार होत आहे. तरी शासनाच्या वतीने त्यांना आर्थिक मदत मिळावी. लग्नसराई बंद असल्याने आर्थिक उत्पन्न मिळत नाही, त्यामुळे घोड्यांचा सांभाळ कसा करायचा, हा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

या वेळी तालुक्यातील घोडे व्यावसायिक संजय सोनवणे, सर्जेराव वाघमोडे, किरण कोकाटे, जावेद शेख, मधुकर गायकवाड, सनी जाधव, भारत फुले, सचिन पाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शासनस्तरावर मदत करण्याचे अश्वासन दिले.

_

३० इंदापूर मोर्चा

इंदापूर शहरातून घोड्यांसह काढलेला वारू मोर्चा.

Web Title: Horse 'Waru Morcha' for fodder in Indapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.