केद्रांच्या पथकाचे ‘वरातीमागून घोडे"""" ; अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:12 AM2020-12-22T04:12:02+5:302020-12-22T04:12:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पुणे, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...

'' Horses behind the show '' '' '' '' '; Excessive rain damage inspection | केद्रांच्या पथकाचे ‘वरातीमागून घोडे"""" ; अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी

केद्रांच्या पथकाचे ‘वरातीमागून घोडे"""" ; अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्यात ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पुणे, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासनाकडे निधी नसल्याने केंद्राकडे निधीची मागणी करण्यात आली होती. यावरून बरेच राजकारण देखील झाले. अखेर केंद्र शासनाने ऑक्टोबर महिन्यांतील नुकसानीची पाहणी करण्यासाठी एक पथक डिसेंबरच्या शेवटी पुणे दौ-यावर पाठवले आहे.

तब्बल तीन महिन्यांनंतर हे पथक येत आहे. दरम्यानच्या काळात नुकसानग्रस्त भागाची शेतकऱ्यांकडून दुरूस्ती, डागडुजी करण्यात आली आहे. यामुळेच केंद्रीय पथकाला झालेले नुकसान नक्की काय दाखविणार असा प्रश्न जिल्हा प्रशासनासमोर उभा राहिला आहे.

पुणे विभागात १४ ऑक्टोबरच्या अतिवृष्टीमुळे ८७ हजार ४१६ हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले. यात सर्वाधिक फटका सोलापूर, पुणे आणि सांगली जिल्ह्याला बसला. मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली. विभागात तब्बल एक हजार २९ जनावरे पाण्यात वाहून गेली. या नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक पुणे विभागाच्या दौऱ्यावर आले आहे. बुधवारी (दि. २३) हे पथक पुणे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहे.

Web Title: '' Horses behind the show '' '' '' '' '; Excessive rain damage inspection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.