Pahalgam Terror Attack: घोडे जोरजोरात येऊ लागले; टेकडीवरून गोळीबाराचा आवाज, पुण्यातील ६९ पर्यटक वाचले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 13:50 IST2025-04-23T13:48:31+5:302025-04-23T13:50:12+5:30
गोळीबाराचा आवाज आला दरम्यान २ तास एका हॉटेल पार्किंगमध्ये थांबल्यावर स्थानिकांनी खूप आधार दिला अन् प्रेमाची वागणुक दिली

Pahalgam Terror Attack: घोडे जोरजोरात येऊ लागले; टेकडीवरून गोळीबाराचा आवाज, पुण्यातील ६९ पर्यटक वाचले
सुनील भांडवलकर
कोरेगाव भीमा (पुणे): जम्मू काश्मीर येथील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात देशातील २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचाही समावेश आहे. डोळ्यांदेखत आपल्या जीवलगांना गमवावं लागल्याने पीडित कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या कुटुंबियांच्या मदतीसाठी महाराष्ट्र सरकारकडून वेगवान प्रयत्न सुरू असून हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांचे पार्थिव महाराष्ट्रात आणण्यासाठी आणि जम्मू-काश्मिरात अडकलेल्या इतर पर्यटकांच्या सुखरूप सुटकेसाठी शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहे. अशातच पुण्यातील अडकलेल्या पर्यटकांनी पहलगाममध्ये घडलेल्या घटनेची आपभीती लोकमतशी बोलताना सांगितली आहे.
उरुळी कांचन (ता.हवेली) मेलेडी ट्रॅव्हल्समधून शिरुर-हवेली व दौंड परिसरातील ६९ पर्यटकांना ज्योती झुरुंगे यांनी पहलगाम याठिकाणी फिरायला नेले होते. या ६९ जणांच्या ग्रुपमधील काही जण इनोव्हा चारचाकी वाहनातून पुढे निघाले होते. दरम्यान त्या वाहनाला रस्त्यात एका हॉटेल व्यावसायिकाने अडवून पेहलगाम याठिकाणी अतिरेक्यांनी हल्ला केला आहे. पुढे न जाण्याची विनंती केल्याने त्यांनी तात्काळ मागून येणा-या वाहनांना पुढे न येण्याच्या सुचना देत मागे फिरण्यास सांगितले. हल्याच्या काही अंतरावरच असताना ग्रुपमधील एका वाहनास माहिती मिळाली. ते तातडीने माघारी फिरल्याने आमच्यावर येणारा धोका टळला असल्याची माहितीची पर्यटकांनी दिली.
ड्रायफ्रुट घ्यायला थांबलो म्हणुन वाचलो
बोरिऐंधी (ता. हवेली ) येथील रोहिनी जीवन गायकवाड यांच्यासह सात जण श्रीनगरमधून तीन वाजण्याच्या पहलगामकडे इनोव्हा वाहनातुन पुढे जाण्यास निघालो. वाटेत अक्कलबाग पाहुन ड्रायफ्रुट घेण्यास थांबलो. नंतर बरसाल व्हॅली येथे पोहोचताच वाहनाचा ड्रायव्हरला स्थानिकांनी माघारी जाण्यास सांगितले. समोरुन घोडे जोर-जोरात येत होते. तर समोरील टेकडीवर गोळीबाराचा आवाज ऐकू आला. दरम्यान दोन तास एका हॉटेल पार्किंगमध्ये थांबल्यावर स्थानिकांनी खूप आधार दिला आणि प्रेमाने वागणुक दिली. नंतर मिलीटरीने रस्ता रिकामा केल्यानंतर आम्ही सर्वजण माघारी श्रीनगर याठिकाणी पोहोचलो. ड्रायफ्रुट व इतर खरेदी करण्यास थांबलो नसतो तर जिवंत राहिलो नसतो अशी प्रतिक्रिया दिली.
भारतीय सैन्य, नेत्यांसह प्रशासनावर पुर्ण विश्वास
शिरुर-हवेली-दौंडमधील आम्ही पर्यटक पहलगाम येथील हल्याच्या काही अंतरावरच होतो. हल्ला झाल्याचे समजताच श्रीनगरमध्ये पोहोचलो व जेथे जागा मिळेल तिथे राहिलो असल्याचे त्यांनी सांगितले. परिस्थिती भयानक काश्मीर पुर्णपणे बंद असल्याने माघारी येण्याची कोणतीही व्यवस्था नाही. तसेच लहान व वृध्द महिला असल्याने आम्हाला सुखरुप पुण्यात नेण्याची मागणी कोरेगाव भिमा येथील पर्यटक शिरीष देशमुख यांनी सांगितले आहे. तसेच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशीही संपर्क झाला असून भारतीय सैन्य, लोकप्रतिनिधीसह प्रशासनावर विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.
पर्यटक सुरक्षित, माघारी आणण्याची व्यवस्था झाली
पेहलगाम येथे शिरुर-हवेली तसेच दौंडमधील ६९ पर्यटक सुरक्षित असून त्यांना माघारी आणण्यााबाबत पालकमंत्री अजित पवार व खासदार सुनिल तटकरे यांच्याशी बोलणे झाले आहे. उद्यापर्यंत त्या सर्व पर्यटकांना सुरक्षितपणे माघारी आणण्यात येईल असे शिरुर हवेलीचे आमदार माऊली आबा कटके यांनी सांगितले.
सर्व पर्यटकांना विमानाने सुखरुप आणणार
पर्यतकांना बसने माघारी आणण्याची व्यवस्था केली होती मात्र बसने पर्यटकांनी येण्यास नकार दिल्याने आज किंवा उद्या सकाळपर्यंत विमानाची व्यवस्था करण्यात येणार असुन सर्व पर्यटकांना सुखरुप आनले जाईल असे केंद्रयि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
हे होते पर्यटक
ज्योती झुरुंगे, शिरीष देशमुख, भाग्यश्री देशमुख, अदित्य जनार्धन खटाटे, जनार्धन बबन खटाटे, मनिषा जनार्धन खटाटे, काजल अदित्य खटाटे, ज्ञानेश्वर जवळकर, साधना जवळकर, निलेश उंबरकर, ज्योती उंबरकर, आर्या उंबरकर, भुमी उंबरकर, प्रसाद सावंत, दिपा प. सावंत, दिपा द. सावंत, राकेश टकाळे, अश्विनी टकाळे, सिध्दांत टकाळे, सुनिल निकम, रेखा निकम, दिपाली गायकवाड, वैश्नवी गायकवाड, तेजश्री गायकवाड, मनिषा गायकवाड, निर्मला आदक, वैशाली धगाते, किरण वाघमोडे, समिर शेख, शाइन शेख, सीधीक शेख, प्रज्वल कुलाल, अश्विनी फुटाने, नासीर सय्यद, विनोद यादव, कोमल यादव, अमोल हंबीर, मिना हंबीर, अरोही हंबीर, गोविंद यादव, ज्योती यादव, कैवल्य यादव, अमोल म्हस्के, स्वप्नाली म्हस्के, वर्षा कांचन , आर्या कांचन, युवराज होले, तेजश्री होले, तनिष्क होले, चित्राक्ष होले, सविता लोणकर, सतिश गायकवाड, दर्शना गायकवाड, प्रज्वल कुतवळ, संध्या देडगे, शौनक देडगे, रोहिणी गायकवाड, आदित्य गायकवाड, प्रथमेश झुरुंगे, शालीनी नागेकर, श्रध्दा काळे, साई काळे, स्नेहा कुलाल, अलका कुदळे, कल्पना गायकवाड, सुषमा शिंदी, रुपाली तांबे, दिपाली लोखंडे, सविता ढमाले आदी ६९ जन या ग्रुपमधील पेहलगाम याठिकाणी सुरक्षित आहेत.