दवाखाना इमारतीच्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:10 AM2021-04-16T04:10:20+5:302021-04-16T04:10:20+5:30
बारामती: शहरात दवाखान्याच्या इमारतीचे काम सुरू असलेल्या ठिकाणाहून विविध प्रकारचे सुमारे ७ लाख १५ हजार रुपयांचे साहित्य चोरून ...
बारामती: शहरात दवाखान्याच्या इमारतीचे काम सुरू असलेल्या ठिकाणाहून विविध प्रकारचे सुमारे ७ लाख १५ हजार रुपयांचे साहित्य चोरून नेल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी याबाबत डॉ. प्रतापसिंह बाबूराव हिरवे (रा. ख्रिश्चन कॉलनी, बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार लाला पोपट लांडगे (रा. प्रतिभानगर, इंदापूर रस्त्यालगत, बारामती) व अनिल सकट (रा. मार्केट यार्डजवळ, बारामती) या दोघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. हिरवे हे भाऊ डॉ. अभिजित, बहिण डॉ. रिना यांच्यासह सांस्कृतिक केंद्रानजीक दवाखाना चालवतात. त्यांच्या नूतन इमारतीचे काम रिंगरोडलगत देवकाते हॉस्पिटलजवळ सुरू आहे. तेथे बांधकामावर देखरेख करण्यासाठी त्यांनी वॉचमन ठेवला आहे. दि.८ रोजी वॉचमनने बांधकामाच्या वस्तू, साहित्य व इतर वस्तू चोरीला गेल्याचे डॉ. हिरवे यांना सांगितले. त्यानुसार त्यांनी जागेवर जाऊन पाहणी केली असता ५० हजार रुपयांच्या आठ सागवानी चौकटी, ६० हजारांचे ११० किलो स्टीलचे अँगल व रिंगा, सळ्या, ५ हजार रुपयांचे फॅन, ५ लाख रुपयांची इमारतीला केलेले इलेक्ट्रिक वायरिंग व फिटिंग पट्ट्या, ४० हजारांचे फोन वायर फिटींग, ५० हजार रुपयांचे बल्ब, पाच हजार रुपयांची जुने वाहन आदी साहित्य चोरीला गेल्याचे दिसून आले.
————————————————
————————————————