लस पुरवठा होत नसल्याने रुग्णालयाने अधिकाऱ्याला अशी घडवली अद्दल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:11 AM2021-04-14T04:11:05+5:302021-04-14T04:11:05+5:30

या सगळ्या प्रकाराला वैतागून अखेर पुण्यातल्या एका खासगी रुग्णालयात चक्क अधिकऱ्यांचेच फोन क्रमांक जाहीर करण्यात आले. कोथरुड मधील या ...

The hospital informed the officer that there was no supply of vaccine | लस पुरवठा होत नसल्याने रुग्णालयाने अधिकाऱ्याला अशी घडवली अद्दल

लस पुरवठा होत नसल्याने रुग्णालयाने अधिकाऱ्याला अशी घडवली अद्दल

Next

या सगळ्या प्रकाराला वैतागून अखेर पुण्यातल्या एका खासगी रुग्णालयात चक्क अधिकऱ्यांचेच फोन क्रमांक जाहीर करण्यात आले.

कोथरुड मधील या रुग्णालयाने बाहेर फलक लावला. त्यावर लिहिले की, या केंद्रावर आत्ता लस उपलब्ध नाहीये. सरकार आणि महापालिकेकडुन लस मिळत नसल्याने लसीकरण बंद आहे. अधिक चौकशी साठी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधा फलकावर संबंधित अधिकाऱ्यांची नावे आणि फोन नंबर जाहीर करण्यात आले होते.

याचा परिणाम असा झाला की या अधिकाऱ्यांना सातत्याने फोन यायला सुरुवात झाली. वैतागलेल्या अधिकाऱ्यांनी या प्रकाराचा शोध घेतला तेव्हा या बोर्ड मुळे हे फोन सुरु झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने रुग्णालयाशी संपर्क साधत या प्रकाराची चौकशी केली. वरिष्ठांकडे संपर्क साधत कारवाईची देखील मागणी केली

Web Title: The hospital informed the officer that there was no supply of vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.