Pune: 'वसतीगृह बॉम्बने उडवले जाऊ शकते..' भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयास धमकीचा ई मेल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 01:57 PM2024-11-07T13:57:41+5:302024-11-07T13:58:01+5:30

ई मेलची तांत्रिक तपासणी केली असता, तो परदेशातून आल्याचे स्पष्ट झाले

'Hospitality can be bombed..' Threatening email to Bharti University Medical College | Pune: 'वसतीगृह बॉम्बने उडवले जाऊ शकते..' भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयास धमकीचा ई मेल

Pune: 'वसतीगृह बॉम्बने उडवले जाऊ शकते..' भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयास धमकीचा ई मेल

धनकवडी (पुणे) : भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयाला बुधवारी धमकीचा ई मेल आला होता. यामध्ये महाविद्यालय आणि वसतीगृह बॉम्बने उडवले जाऊ शकते असा संदेश होता. पोलिसांनी हा ई मेल गांभीर्याने घेऊन संपुर्ण महाविद्यालय बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या (बीडीडीएस) मदतीने तपासले. मात्र संशयास्पद असे काहीही आढळले नाही. याप्रकरणी महाविद्यालयाचे डॉ.मंदार दत्तात्रय करमरकर (५५,रा.पर्वती दर्शन) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अज्ञात ई मेल धारकाविरुध्द तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या ई मेल आयडीवर एका व्यक्तीने दोन वेळा ई मेल पाठवला. यामध्ये तामिळनाडूतील एका घटनेचा संदर्भ देत महाविद्यालय आणि वसतीगृह परिसरात बॅम्बस्फोट होणार असल्याची माहिती होती. डॉ. मंदार करमरकर यांनी तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. 

यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालय आणि वसतीगृह परिसराची तपासणी केली. यावेळी बीडीडीएस पथकालाही पाचारण करण्यात आले होते. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमुळे मात्र खळबळ माजली होती. ई मेलची तांत्रिक तपासणी केली असता, तो परदेशातून आल्याचे स्पष्ट झाले. ई मेलमध्ये स्पष्टपणे अशी कोणतीही धमकी नव्हती. मेल करणाऱ्याला नक्की काय म्हणायचे हे पाठवलेल्या संदेशात कळत नव्हते. मात्र ई मेल मुळे पोलिसांची मोठी धावपळ उडाली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल पाटील करत आहेत.

Web Title: 'Hospitality can be bombed..' Threatening email to Bharti University Medical College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.