धनकवडीतील दुर्घटनेप्रकरणी हॉटेल मालक अटकेत; कामाच्या पहिल्याच दिवशी कामगाराने गमावला जीव

By नितीश गोवंडे | Updated: March 31, 2025 17:09 IST2025-03-31T17:09:11+5:302025-03-31T17:09:53+5:30

दुर्घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यावर हाॅटेल मालकाच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडल्याचे उघडकीस आले

Hotel owner arrested in Dhankawadi accident case Worker loses life on first day of work | धनकवडीतील दुर्घटनेप्रकरणी हॉटेल मालक अटकेत; कामाच्या पहिल्याच दिवशी कामगाराने गमावला जीव

धनकवडीतील दुर्घटनेप्रकरणी हॉटेल मालक अटकेत; कामाच्या पहिल्याच दिवशी कामगाराने गमावला जीव

पुणे: धनकवडीतील एका उपाहारगृहात रविवारी दुपारी सिलिंडरमधून गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत कामगाराचा मृत्यू झाल्याप्रकरणी हॉटेल मालकाला अटक करण्यात आली. कामगाराच्या मृत्यू, तसेच निष्काळजीपणा दाखवल्याप्रकरणी उपाहारगृह मालकाविरोधात सहकारनगर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

कामाचा पहिलाच दिवस अखेरचा ठरला! धनकवडीच्या आगीत २० वर्षीय तरुणाचा मृत्यू 

पुणे-सातारा रस्त्यावरील के. के. मार्केट परिसरातील हाॅटेल साईबामध्ये रविवारी (दि. ३०) दुपारी साडेचारच्या सुमारास सिलिंडरमधून गळती होऊन आग लागली. आगीत उपाहारगृहातील कामगार संतोष श्रीसेन हेगडे (२६) याचा मृत्यू झाला. आग लागल्यानंतर शेजारी असलेल्या दोन दुकानांना झळ पाेहोचली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. आगीत दुकानातील फर्निचर, तसेच शेजारी असलेल्या दुकानांमधील माल जळाला. दुर्घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. सायबा हाॅटेलचे मालकाच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी उपाहारगृह मालक केशव श्रीमंत जाधव (२८, रा. साई निसर्ग सोसायटीच्या मागे, कात्रज-कोंढवा रस्ता) यांना अटक करण्यात आली. याबाबत प्रसाद केंची (३०, रा. सुखसागरनगर, कात्रज) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक सुरेखा चव्हाण तपास करत आहेत.

कामाचा पहिला दिवस

दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेला सायबा हाॅटेलमधील कामगार संतोष हेगडे याचा कामाचा पहिला दिवस होता. कामाच्या पहिल्या दिवशी उपाहारगृहात सिलिंडरमधून गळती झाली. या घटनेत त्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Hotel owner arrested in Dhankawadi accident case Worker loses life on first day of work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.