वारजे येथे हॉटेल मालकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 03:05 PM2018-06-19T15:05:01+5:302018-06-19T15:05:01+5:30
रात्री दहाच्या सुमारास हॉटेलचे मालक अमर कणसे यांनी एका मित्राला फोन करुन आपण आता खडकवासला येथे असून आत्महत्या करत असल्याचे सांगितले़. पोलिसांनी खडकवासला परिसरात शोध घेतला असता ते ...
पुणे : वारजे येथील राजमुद्रा हॉटेलच्या मालकाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली़ हा प्रकार मंगळवारी सकाळी पावणेअकरा वाजता उघडकीस आला़. अमर गुरुनाथ कणसे (वय ४९, रा़ समर्थ कुंज अपार्टमेंट, धायरी) असे त्यांचे नाव आहे़.
वारजे येथील कात्रज देहुरोड बाह्यवळण मार्गावर राजमुद्रा हे हॉटेल आहे़. हॉटेलचे मालक अमर कणसे यांनी सोमवारी रात्री आपल्या फेसबुकवर अकाउंटवर आपण आत्महत्या करत असल्याचे लिहिले़. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास त्यांनी एका मित्राला फोन करुन आपण आता खडकवासला येथे असून आत्महत्या करत असल्याचे सांगितले़. या मित्राने तातडीने वारजे पोलिसांशी संपर्क साधून याची माहिती दिली़. वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव मोळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्रभर खडकवासला परिसरात शोध घेतला़. परंतु ते सापडले नाही.
हॉटेल राजमुद्राच्या जवळच एक पंक्चरचे दुकान आहे़. तेथील कामगाराला सकाळी पावणेअकराच्या सुमारास हॉटेलच्या मागील बाजूला जुनी अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीत अमर कणसे हे मृत अवस्थेत पडलेले दिसले़. त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली़. पोलिसांनी त्यांचा मृतदेह ससून रुग्णालयात पाठविला आहे़. डॉक्टरांनी व्हिसेरा राखून ठेवला असून वारजे पोलीस अधिक तपास करत आहे.