Pune Crime: हप्ता पाहिजे म्हणून हॉटेल मालकाला कोयत्याने वार करून मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 06:49 PM2021-11-22T18:49:17+5:302021-11-22T18:49:23+5:30
घटनेत परस्पर विरुध्द ४ जणांवर खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे
राजगुरूनगर : खेड तालुक्यातील डेहणे येथे हॉटेलेच्या काचा फोडून हप्ता पहिजे म्हणून हॉटेल मालकाला कोयत्याने वार करून जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेत परस्पर विरुध्द ४ जणांवर खेडपोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेहणे येथील हॉटेल मालक शंकर दत्तात्रय कोरडे रा. डेहणे ( ता.खेड ) यांनी फिर्यादित म्हटले आहे. की,हॉटेलमध्ये पत्नी व आचारी व भाऊ जगदिश सतुभाउ कोरडे असे हॉटेलमध्ये काम करत होते. कोरडे हे हॉटेललगत असणाऱ्या घरी होते. दरम्यान अचानक हॉटेलच्या काचा फुटण्याचा आवाज आल्याने ते पळत हॉटेलमध्ये आले. दरम्यान आकाश हुरसाळे व त्याचे सोबत इतर २ ते ३ मुले होती. त्यांच्या हातात कोयते होते. आकाश हुरसाळे याला फिर्यादीने विचारले आमच्या हॉटेलच्या काचा का फोडतो, मला तू हप्ता का देत नाही असे म्हणून चिडून आकाश हुरसाळे याने हातातील कोयत्याने तसेच त्याचे सोबत असलेल्या मुलाने कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात वार करुन जखमी केले.
दुसऱ्या फिर्यादीत रोशन अरुण परड (वय १७ ) रा.मंदोशी (ता.खेड ) याने म्हटले आहे की, मी व मित्र मनिष आंबेकर, निकेतन जाधव, असे तिघेजण शंकर कोरडे यांचे हॉटेलमध्ये जेवण करण्यास गेलो होतो. आम्ही हॉटेलमध्ये बसलो होतो तेव्हा फीर्यादीच्या ओळखीचे समिर कोरडे, नामदेव कोरडे, शंकर कोरडे सर्व रा. डेहणे (ता.खेड ) हे हॉटेलमध्ये दारु पित बसले होते. ते आमच्याकडे पाहून शिवीगाळ करत होते. म्हणुन फिर्यादीने विचारले तुम्ही शिव्या कोणाला देता, दरम्यान बाचाबाची झाली. नामदेव कोरडे हा हॉटेलमधून बाहेर जाऊन पुन्हा हॉटेलमध्ये तीन कोयते घेऊन आला. नामदेव कोरडे यांनी त्याचे हातातील कोयते शंकर कोरडे, समिर कोरडे यांचेकडे एक एक दिला व ते आमचे जवळ येवुन आम्हास मारहाण करु लागले. मला नामदेव कोरडे यांनी फिर्यादीच्या पाठीत कोयत्याने मारहाण करुन फिर्यादीला जखमी केले. त्यावेळी सोबत असलेले फिर्यादीचे मित्र मनिष आंबेकर व निकेतन जाधव हे मारहाणीचे भितीने पळून गेले. नामदेव कोरड शंकर कोरडे व समिर कोरडे यांनी रोशन परड याला लाथाबुक्कयांनी मारहाण केली. पुढील तपास खेड पोलीस करत आहे.