लॉकडाऊनमधील पाण्याच्या सरासरी बिलामुळे हॉटेल व्यावसायिक हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:09 AM2021-01-04T04:09:37+5:302021-01-04T04:09:37+5:30

पुणे : कोरोनामुळे पुकारलेल्या लॉकडाऊनच्या काळात सहा महिन्यांपासून अधिक काळ बंद असलेल्या शहरातील हॉटेल व्यावसायिकांना पाणीपरवठा विभागाने पाणी वापराचे ...

Hoteliers are worried about the average water bill in the lockdown | लॉकडाऊनमधील पाण्याच्या सरासरी बिलामुळे हॉटेल व्यावसायिक हवालदिल

लॉकडाऊनमधील पाण्याच्या सरासरी बिलामुळे हॉटेल व्यावसायिक हवालदिल

Next

पुणे : कोरोनामुळे पुकारलेल्या लॉकडाऊनच्या काळात सहा महिन्यांपासून अधिक काळ बंद असलेल्या शहरातील हॉटेल व्यावसायिकांना पाणीपरवठा विभागाने पाणी वापराचे सरासरी बिल (अ‍ॅव्हरेज) पाठविले आहे़ मात्र, हॉटेल बंद असताना हजारो रुपयांच्या या बिलामुळे हॉटेल व्यावसायिक हवालदिल झाले आहे़

शहरामध्ये साधारणत: दहा हजारांहून अधिक छोटे-मोठे हॉटेल व्यावसायिक आहेत़ कोरोना आपत्तीमुळे बंद असलेल्या हॉटेल्सला कोरोना संसर्गाच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करून, दीड महिन्यापूर्वी प्रत्यक्ष व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली. दरम्यान, अनेक कर्मचारी घरी परतल्याने हॉटेल व्यवसाय सुरू करण्यातही चालकांना अडथळे आले आहेत़ त्यातच विजेसह आता महापालिकेने पाणी वापराचे पाठविलेले सरासरी बिल यामुळे हॉटेल व्यावसायिक हवालदिल झाले आहेत़ पाणी वापराचे कुठल्याही रीडिंगशिवाय आलेल्या बिलांमुळे सर्वच स्तरातून यामुळे संताप व्यक्त होत आहे़

याबाबत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधला असता, विभागाचे अधीक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी सध्या पाठविलेल्या बिलांप्रमाणे कोणी रक्कम भरली असेल तर पुढील बिलांमधून ती वजा करण्यात येईल. तसेच, कोणी बिल भरण्यापूर्वी महापालिकेशी संपर्क साधल्यास मिटर रीडिंग घेऊन प्रत्यक्ष बिल देण्यात येतील, असे सांगितले आहे़

Web Title: Hoteliers are worried about the average water bill in the lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.