हॉटेलचालकांनो, सावधान! एक दोन नव्हे तर अनेकांचा कारवाईसाठी असणार तुमच्यावर कडक 'वॉच'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2020 11:25 AM2020-10-08T11:25:23+5:302020-10-08T11:26:58+5:30
हॉटेल चालु ठेवण्यास मान्यता मिळाली असली तरी नियमांचे काटेकोर पालन न करणाऱ्यांवर महापालिकेचा जागता पहारा राहणार आहे.
पुणे : हॉटेल, बार, रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी देताना घालून दिलेले नियम व अटी न पाळणाऱ्या संबंधित व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांसह महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आले आहे.
महापालिकेने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेलचालकांवर कारवाई करण्याचे अधिकार, केवळ एक दोन अधिकारी वर्गाला नव्हे तर पालिकेतील सर्व विभागातील अधिकाऱ्यांना देऊ केले आहेत. त्यामुळे आता हॉटेल चालु ठेवण्यास मान्यता मिळाली असली तरी, नियमांचे काटेकोर पालन न करणाऱ्यांवर महापालिकेचा जागता पाहराच राहणार आहे.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याकरिताचे आदेश बुधवारी जारी केले आहेत. या आदेशानुसार शहरातील जे हॉटेल, बार व रेस्टॉरंटचालक नियमांचे उल्लंघटन करतील त्यांच्यावर, महापालिकेच्या सर्व उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, प्रमुख/उप आरोग्य निरीक्षक, वरिष्ठ आरोग्य निहॉटेलचालकांनो सावधान : एक दोन नव्हे तर अनेकांना दिले पालिकेने कारवाईचे अधिकार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : हॉटेल, बार, रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी देताना घालून दिलेले नियम व अटी न पाळणाºया संबंधित व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांसह महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आले आहेत़
महापालिकेने नियमांचे उल्लंघन करणाºया हॉटेलचालकांवर कारवाई करण्याचे अधिकार, केवळ एक दोन अधिकारी वर्गाला नव्हे तर पालिकेतील सर्व विभागातील अधिकाºयांना देऊ केले आहेत़ त्यामुळे आता हॉटेल चालु ठेवण्यास मान्यता मिळाली असली तरी, नियमांचे काटेकोर पालन न करणाºयांवर महापालिकेचा जागता पाहराच राहणार आहे़
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याकरिताचे आदेश बुधवारी जारी केले आहेत़ या आदेशानुसार शहरातील जे हॉटेल, बार व रेस्टॉरंटचालक नियमांचे उल्लंघटन करतील त्यांच्यावर, महापालिकेच्या सर्व उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, प्रमुख/उप आरोग्य निरीक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, अतिक्रमण निरीक्षक, परवाना निरीक्षक, मेंटेनन्स सर्व्हेअर व सर्व कार्यालयीन अधिक्षक यांना कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
सदर आदेशात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर प्रथम २ हजार ५०० रूपये, दुसऱ्यांदाही नियम न पाळल्यास पाच हजार रूपये तर तिसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ७ हजार ५०० रूपये दंड आकारण्याबाबत निर्देष देण्यात आले आहेत. याचबरोबर वारंवार उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांचा परवाना रद्द करण्याबाबतही यात नमूद करण्यात आले आहे.
-----------------------