Pune: मोबाईलवरून हॉटस्पॉट दिले नाही; दारूच्या नशेत चौघांनी केला मॅनेजरचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 19:22 IST2024-09-02T19:20:13+5:302024-09-02T19:22:09+5:30
फायनान्स कंपनीचे मॅनेजर रात्री शतपावली करत असताना दारूच्या नशेत असलेल्या चौघांनी त्यांना हॉटस्पॉट मागितले होते

Pune: मोबाईलवरून हॉटस्पॉट दिले नाही; दारूच्या नशेत चौघांनी केला मॅनेजरचा खून
हडपसर: मोबाईल वरील हॉटस्पॉट न दिल्याने दारूच्या नशेत असणाऱ्या चौघांनी मध्यरात्री फायनान्स कंपनीच्या मॅनेजर वासुदेव कुलकर्णी यांचा निर्घुण खून केला. कोणतेही पुरावा नसताना हडपसरपोलिसांनी या चार आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयूर अतुल भोसले, वय- 19, धंदा- फर्निचर दुकानावर काम, पत्ता- गणपती मंदिराजवळ, नितीन भोसले यांच्या बाजूला, वेताळ बाबा वसाहत, हडपसर, पुणे.यांच्या सह 3 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी अटक केली आहे. मयूर भोसले हा मूळचा फलटण चा असून मामा कडे राहत आहे .वासुदेव कुलकर्णी हे पुण्यातील एक प्रतिष्ठीत फायनान्स कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत होते. रविवारी रात्री वासुदेव कुलकर्णी हे त्यांच्या घरासमोर शतपावली करत असताना आरोपी चार जण त्यांच्या जवळ येवून मोबाईलचे हॉटस्पॉट मागितले. हे चौघे दारूच्या नशेत होते. त्यांना हॉटस्पॉट न दिल्याने कोयत्याने चेहऱ्यावर वार केले. या खुनाचे कोणतेही धागेदोरे नसताना पोलिसांनी मोठया शिताफीने आरोपीना अटक केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत तपास केला दरम्यान, पोलीसांना त्यांच्या परिसरात कडक बंदोबस्त केला आहे. हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष पांढरे अधिक तपास करीत आहेत .