पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत हॉटस्पॉट गावे दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:10 AM2021-04-20T04:10:17+5:302021-04-20T04:10:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या काही दिवसांत ग्रामीण भागात देखील कोरोनाचा संसर्ग प्रचंड वेगाने वाढत आहे. हाॅटस्पाॅट गावांच्या ...

Hotspot villages doubled in the second wave than in the first wave | पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत हॉटस्पॉट गावे दुप्पट

पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत हॉटस्पॉट गावे दुप्पट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गेल्या काही दिवसांत ग्रामीण भागात देखील कोरोनाचा संसर्ग प्रचंड वेगाने वाढत आहे. हाॅटस्पाॅट गावांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यात हाॅटस्पाॅट गावांची संख्या १४४ एवढी होती. परंतु, कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत ही संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे हॉटस्पॉट गावांची संख्या दुपटीने वाढली आहे. जिल्ह्यात आजअखेर हॉटस्पॉट गावांची संख्या तब्बल ३०८ झाली आहे.

जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दोन प्रकारची गावे दिसत आहेत. हाॅटस्पाॅट गावांची संख्या वाढ असताना तब्बल ४४४ गावांमध्ये आजही एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही. जिल्ह्यात आज ३०८ गावे हॉटस्पॉट बनली आहे. त्यामध्ये शिरूर, जुन्नर, हवेली, दौंड, इंदापूर तालुक्‍यांत सर्वाधित हॉटस्पॉट गावे आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत २० सप्टेंबर २०२० मध्ये सर्वाधिक १४४ हॉटस्पॉट गावांची नोंद झाली. त्यानंतर जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्गाचा वेग मंदावला. त्यामुळे अनेक नियम शिथिल झाले. मात्र, फेब्रुवारी २०२१ मध्ये कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले आणि अवघ्या महिन्याभरात १० मार्च रोजी ग्रामीण भागातील हॉटस्पॉट गावांची संख्या ४१ वर पोहोचली. मार्चअखेर ही संख्या १३१ इतकी होती. तर १४ एप्रिल रोजी यामध्ये दुप्पट वाढ होवून ३०८ वर पोहोचली आहे. सुरुवातीला हवेली, शिरूर, इंदापूर, बारामती आणि खेड या तालुक्‍यांमध्ये बाधित सापडण्याचे प्रमाण अधिक होते. मात्र, आता वेल्हा तालुका सोडला तर अन्य सर्व तालुक्‍यांमध्ये बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, मार्चअखेरनंतर वेल्हे तालुक्‍यातही बाधित सापडू लागल्याने प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.

---

तालुका कंटेन्मेंट झोन संख्या

तालुका २० सप्टेंबर २०२० १४ एप्रिल २०२१

हाॅटस्पाॅट ग्रामपंचायती हॉटस्पॉट ग्रामपंचायती

आंबेगाव - २३ २८

बारामती - १० २८

भोर - ० ४

दौंड - ५ ३०

हवेली - ११ ३०

इंदापूर - १७ ३०

जुन्नर - २६ ३५

खेड १० २५

मावळ - ११ ९

मुळशी - १ १८

पुरंदर - ६ २९

शिरूर - २१ ४०

वेल्हा - ३ २

Web Title: Hotspot villages doubled in the second wave than in the first wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.