तासाभराच्या पावसाने अंबिल ओढ्याला पूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:09 AM2021-06-05T04:09:22+5:302021-06-05T04:09:22+5:30
कोट आज हा अनुभव बघायला मिळतोय की यापुलाला जर ओढ्याच्या कडेच्या झाडांनी किंबहुना एखादे झाड जरी पडले आणि ...
कोट
आज हा अनुभव बघायला मिळतोय की यापुलाला जर ओढ्याच्या कडेच्या झाडांनी किंबहुना एखादे झाड जरी पडले आणि त्याचा आडवे झाले पूर आला तर हे पाणी सबंध पुलाच्याकडेनी रस्त्यावरून वाहायला लागणार आणि गेल्या वेळी जसे पावसाच्या पाण्याने थैमान घातले होते त्याचप्रमाणे ही वस्तुस्थिती होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी कृपया नगरसेवकांना विनंती आहे की, त्यांनी पावसाच्या पुराच्या अगोदर लक्ष घालावे. विजय हुरकडली स्थानिक रहिवासी
या ओढ्याच्याकडेने जी काही जागा आहे, जास्तीची राडारोडा टाकलेला आहे, माती आहेत दगड आहेत ती साफ करून जास्तीत जास्त पाणी ओढ्यातूनच वाहून जाण्यासाठी दिशा (वाट) करून द्यावी. या ओढ्याच्याकडेने लावलेल्या झाडांची काहीतरी विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. गेल्या वेळेस जसे पुराचे पाणी घराघरात पोहोचले होते. लोकांचे खूप नुकसान झाले. त्याच प्रमाणे ट्रेझर पार्कची मागील भिंत पडल्यामुळे जे लोकांना घराच्या बाहेर पडायला वेळ मिळाला त्यामुळे लोकांचा जीव वाचू शकला. घराबाहेर पडायला वेळ मिळाला आणि सुरक्षित ठिकाणी जाउ शकलो. परंतु या वेळेस ट्रेझर पार्क ने आरसीसी भिंत घातलेली आहे. त्यामुळे त्यांच्या सोसायट्यांमध्ये पार्किंग मध्ये पाणी जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे पुराचे जे काय पाणी येते ते ओढ्याचा बाहेर येण्याची जास्तीत जास्त शक्यता नाकारता येत नाही .