शॉर्ट सर्किटमुळे घर जळाले
By admin | Published: March 26, 2017 01:26 AM2017-03-26T01:26:58+5:302017-03-26T01:26:58+5:30
तरडे (ता. हवेली) येथील दीपक लक्ष्मण मोहळकर यांच्या घरामध्ये शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास
उरुळी कांचन : तरडे (ता. हवेली) येथील दीपक लक्ष्मण मोहळकर यांच्या घरामध्ये शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत घर पूर्णपणे जळून खाक झाल्याची फिर्याद स्वप्निल कुंजीर यांनी लोणी काळभोर पोलिसांत दिली.
घरामध्ये अचानक आग लागल्याचे पाहून घरात असलेल्या महिला घाबरून घराबाहेर पडल्या. घरामध्ये गॅस सिलिंडर असल्याने आग विझविण्यासाठी कोणी ग्रामस्थ धजावत नव्हता. घरातील गॅस सिलिंडरचा ज्यावेळी मोठा स्फोट व आवाज झाला. त्यानंतर घराचे पत्रे दूरवर फेकले गेले. तसेच यावेळी जमलेल्या ग्रामस्थांनी पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला ,पण तोपर्यंत घरातील सर्व वस्तू जाळून खाक झाल्या होत्या. मात्र, आग नेमकी कोणत्या कारणाने लागली याबाबत चौकशी चालू आहे.
घरामध्ये असलेली २५ पोती धान्य, रोख रक्कम ३० हजार, गॅस, टीव्ही, शौचालयाची टाकी, इतर लहान-मोठे साहित्य व घराशेजारी बांधलेल्या दोन मेंढ्या होरपळून मेल्याने सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती थेऊरचे मंडलाधिकारी हरिदास चाटे यांनी दिली. (वार्ताहर)