शनिवारवाड्याजवळील घराला अाग ; घरातील सामान जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 07:41 PM2018-11-12T19:41:44+5:302018-11-12T19:42:47+5:30
शनिवारवाड्याजवळील देशपांडे वाड्याला अाज संध्याकाळी अाग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी 20 ते 25 मिनिटात अाग अाटाेक्यात अाणली.
पुणे : शनिवारवाड्याजवळील देशपांडे वाड्यात अाज संध्याकाळी 6.30 च्या सुमारास अाग लागली. या अागीत घरातील सामान जळून खाक झाले. अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. 20 ते 25 मिनिटात अाग अाटाेक्यात अाणण्यात अाली. या अागीत कुठलिही जिवीत हानी झाली नाही.
कसबा अग्निशमन केंद्राचे स्टेशन अाॅफिसर रवींद्र अाढाव यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारवाड्याजवळील देशपांडे वाड्याला अाग लागली हाेती. अाग लागली तेव्हा घरात काेणी नव्हते. घरातील सर्वजण खरेदीसाठी बाहेर गेले हाेते. देवा समाेर लावलेल्या दिव्याच्या संपर्कात पडदा अाल्याने अाग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत अाहे. अग्निशमन दलाला अागीची माहिती मिळताच कसबा अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वाडा बंद असल्याने कुलुप ताेडून जवानांनी वाड्यात प्रवेश केला. पाण्याचा मारा करत 20 ते 25 मिनिटात अाग अाटाेक्यात अाणण्यात अाली.
दरम्यान या अागीत कुठलिही जिवीत हानी झाली नसली तरी घरातील सामान जळून खाक झाल्याने माेठ्याप्रमाणावर अार्थिक नुकसान झाले अाहे.