पुणे शहर पोलिसांना मिळतोय ग्रामीणचा भत्ता! पोलिसांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 03:02 PM2021-09-24T15:02:06+5:302021-09-24T15:20:41+5:30

लोणी काळभोर व लोणीकंद ही पुणे ग्रामीण पोलीस दलातील दोन पोलीस स्टेशन पुणे आयुक्तालयात सामील झाल्यानंतर या दोन्ही ठिकाणी पुणे शहर पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार बदलून आले

house rent allowance pune rural police loni kalbhor lonikand | पुणे शहर पोलिसांना मिळतोय ग्रामीणचा भत्ता! पोलिसांमध्ये नाराजी

पुणे शहर पोलिसांना मिळतोय ग्रामीणचा भत्ता! पोलिसांमध्ये नाराजी

Next

कदमवाकवस्ती : पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर आणि नगर रस्त्यावरील लोणीकंद या दोन्ही पोलिस ठाण्यांचा समावेश पुणे पोलिस आयुक्तालयात करावा, याबाबतचा प्रस्ताव २०१७ मध्ये पोलिस महासंचालक कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता. त्यानंतर २६ ऑक्टोबर २०२० रोजी लोणीकंद पोलिस  ठाण्याचा समावेश पुणे पोलिसांच्या परिमंडळ चारमध्ये तसेच लोणी काळभोर पोलिस ठाण्याचा समावेश परिमंडळ पाचमध्ये करण्याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली होती. १६ मार्च रोजी या दोन्ही पोलीस ठाण्यांचा समावेश पुणे पोलीस आयुक्तालयात करण्याचा निर्णय शासनाने घेतला.

लोणी काळभोर व लोणीकंद ही पुणे ग्रामीण पोलीस दलातील दोन पोलीस स्टेशन पुणे आयुक्तालयात सामील झाल्यानंतर या दोन्ही ठिकाणी पुणे शहर पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार बदलून आले. पुणे शहर पोलीस दल व पुणे ग्रामीण पोलीस दल यामध्ये घर भाडे भत्ता, ड्युटीचा वेळ असे फरक आहेत. यामध्ये शहर पोलीस दलातील अंमलदारांना घर भाडे भत्ता हा ग्रामीण दलातील अंमलदरापेक्षा जास्त आहे. पुणे शहर पोलीस दलातील सहायक पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई यांचा घरभाडे भत्ता(Hra) हा बेसिक वेतनाच्या २४% आहे तर हाच घर भाडे भत्ता पुणे ग्रामीण पोलीस दलातील अंमलदारासाठी ८% आहे. परंतु पुणे शहरातून लोणी काळभोर व लोणी कंद या पोलीस ठाण्यात बदलून आलेल्या शहर दलातील अंमलदारांना घर भाडे भत्ता हा पुणे ग्रामीण दलातील अंमलदाराप्रमाणेच मिळत असल्याने शहर दलातील पोलीस अंमलदार यांना दरमहा ६ ते ९ हजार रुपयांचा भुर्दंड बसत असल्याने त्यांच्यामध्ये नाराजगीचा सूर उमटत आहे.

यामध्ये लोणी काळभोर पोलीस स्टेशन व लोणी कंद पोलीस स्टेशन मिळून अंदाजे २०० पोलीस अंमलदारांना या कमी घर भाडे भत्त्याचा फरक पडत असून यावर लवकरात लवकर बदल करावा अशी मागणी दोन्ही पोलीस ठाण्याच्या पोलीस अंमलदारांकडून होत आहे.

Web Title: house rent allowance pune rural police loni kalbhor lonikand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.