घरोघरी पडतोय प्रचारपत्रकांचा कचरा

By admin | Published: October 11, 2014 11:43 PM2014-10-11T23:43:41+5:302014-10-11T23:43:41+5:30

उमेदवारांची प्रचारपत्रके, जाहीरनामा, परिचयपत्रके, कार्यअहवाल, पक्षांचे जाहीरनामे रस्तोरस्ती, गल्लोगल्ली, घरोघरी कच:यासारखे पडत आहेत.

House waste | घरोघरी पडतोय प्रचारपत्रकांचा कचरा

घरोघरी पडतोय प्रचारपत्रकांचा कचरा

Next
>पिंपरी : उमेदवारांची प्रचारपत्रके, जाहीरनामा, परिचयपत्रके, कार्यअहवाल, पक्षांचे जाहीरनामे रस्तोरस्ती, गल्लोगल्ली, घरोघरी कच:यासारखे पडत आहेत. मात्र हे प्रचारसाहित्य वारंवार एकाच ठिकाणी टाकले जात असल्याने रद्दी साचत आहे.
सर्व तयारीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला उमेदवार हजारो पत्रके छापतो. बरेच उमेदवार किमान 1क् हजारांर्पयत पत्रके छापून घेतो. छापखान्यातून गरज पडतील तशी पत्रके आणि इतर छापील प्रचार साहित्य मागविले जाते. उमेदवाराचे कार्यकर्ते घरोघरी पत्रके वाटत असतात. दिसेल, त्या घरी पत्रके देण्याचा प्रयत्न होतो. दरवाजा बंद असल्यास कडीत खोचले जाते किंवा खिडकीतून आत टाकले जाते. सोसायटींच्या तळमजल्यावरील लेटरबॉक्समध्येही ती टाकली जातात. 
 विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवाराची संख्या पिंपरी 23, चिंचवड 24 , भोसरी 17 अशी आहे. याबरोबरच अपक्ष उमेदवार आहेत. उमेदवार आपली व आपल्या पक्षाची कामे व चिन्ह तसेच भविष्यातील कामे यांचा प्रचार पत्रकाद्वारे करतात. घरोघरी पडणारी ही पत्रके वाचली जातातच असे नाही. तर कित्येक वेळा ही तशीच कच:यात टाकून दिली जातात. ब:याच वेळा एकाच घरी एक पत्रक दिवसातून वारंवार येऊन पडते. यामुळे घरातील सदस्यही या पत्रकांना कंटाळून पत्रकांकडे दुर्लक्ष करतात. कारण या पत्रकांचा कचराच गोळा करावा लागतो. 
 रस्त्यावर, पार्किगमध्ये पत्रके पडलेली दिसत आहेत. कार्यकर्ते पत्रके रिक्षाच्या प्रचारात, पदयात्रेतून हजारोच्या संख्येने वाटतात. पत्रके वाचून ती तिथेच चुरगाळून टाकून दिली जातात. काही उमेदवार पत्रके व जाहीरनाम्याच्या वाटपासाठी वेगळी यंत्रणाही राबवितात.
पत्रके वाटण्याची व छापण्याची नियमावली असते. उमेदवाराला प्रचार पत्रकांचा सर्व हिशेब निवडणूक आयोगाला देणो बंधनकारक आहे. करण्यात आलेला खर्च किती व कोणत्या स्वरूपाचा आहे, 
हे आयोगाला कळवणो क्रमप्राप्त असते. 
मात्र पक्षाची पत्रके, जाहीरनामे, परिचयपत्रके किती प्रमाणात छापली जावीत, ती कशाप्रकारे वाटली जावीत व स्टिकर, पत्रके कोठे लावली जावीत याचीही नियमावली आहे. छपाईनंतर स्टिकर, पत्रके खांब अथवा ठिकठिकाणी भिंतीवरही लावली जातात. यामुळे ही स्टिकर, पत्रके  काढताना भिंतीचे स्वरूप ही विद्रूप झालेले दिसून येते. 
नियमांचे उल्लंघन सर्रास केले जात असल्याचे दिसत आहे. मोठय़ा प्रमाणावर पत्रके छापली गेली आहेत. एक पत्रकाची किंमत किमान 5क् ते 8क् पैसे आहे. अशी पत्रके हजारोंच्या स्वरूपात छापली जातात. पक्षाच्या जाहीरनाम्याच्या पुस्तिकेची किंमत ही 3क् ते 4क् रुपये आहे. मात्र या पत्रकांना किंमत उरत नाही ती कच:यासारखी 
फे कून दिली जातात.(प्रतिनिधी)
 
विधानसभेसाठी उमेदवाराला एकूण खर्च करण्याची मर्यादा 28 लाख इतकी आहे. यातून उमेदवार आपला प्रचाराचा सर्व खर्च करीत असतो. उमेदवाराने केलेल्या खर्चाचे विवरण निवडणूक आयोगाकडे असते. उमेदवाराने केलेल्या बिलांमध्ये काही घोळ आढळल्यास त्वरित कारवाई करण्यात येते.
- डॉ. यशवंत माने, 
निवडणूक अधिकारी, पिंपरी
मतदारसंघ 

Web Title: House waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.