आजपासून पुण्यात पाचच्या आत घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:09 AM2021-06-28T04:09:41+5:302021-06-28T04:09:41+5:30
अत्यावश्यक सोडून इतर सर्व दुकाने दररोज दुपारी ४ पर्यंत सुरू राहतील, मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह पूर्णपणे बंद असतील. रेस्टॉरंट, बार, ...
अत्यावश्यक सोडून इतर सर्व दुकाने दररोज दुपारी ४ पर्यंत सुरू राहतील, मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह पूर्णपणे बंद असतील. रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत खुली असतील. पार्सल सेवा मात्र रात्री ११ पर्यंत सुरू राहील. सार्वजनिक उद्याने, मैदाने, चालण्यासाठी व सायकलिंगसाठी सकाळी ५ ते ९ पर्यंत सुरू राहतील. आऊटडोअर स्पोर्ट्स सकाळी ५ ते ९ पर्यंतच सुरू राहतील. सर्व कार्यक्रम ५० व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये सुरू ठेवता येतील. सर्व मंदिरे व धार्मिक स्थळे पूर्णपणे बंद असतील. अंत्यविधी, दशक्रियेसाठी २० लोकांची मुभा आहे. पीएमपी ५० टक्के क्षमतेने सुरू असेल. तर मद्यविक्रीची दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंतच खुली ठेवता येतील.