बारामती तालुक्यात घरोघरी अॅन्टिजन तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:09 AM2021-07-30T04:09:29+5:302021-07-30T04:09:29+5:30
बारामती : तालुक्यामधील ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, बुधवारी (दि. २८) पंचायत समिती ...
बारामती : तालुक्यामधील ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, बुधवारी (दि. २८) पंचायत समिती आरोग्य विभागामार्फत शहर व ग्रामीण भागात घरोघरी जाऊन अॅन्टिजन तपासणी करण्यात आली. एकूण ९२३ अॅन्टिजन तपासणी करण्यात आल्या. यामध्ये १३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.
या तपासणी कॅम्पपूर्वी संबंधित गावातील समुदाय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांनी योग्य ते नियोजन करून जास्तीत जास्त लोकांची तपासणी करून घ्यावी. तसेच संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी, सरपंच यांचेमार्फत पोलीस यंत्रणेला कळविण्यात यावे व त्यांची मदत अॅन्टिजन कॅम्पकरिता घ्यावी, अशा सूचनादेखील आरोग्य अधिकारी यांनी दिल्या होत्या. स्थानिक लोकप्रतिनिधी यांचादेखील सहभाग घेऊन जास्तीत जास्त तपासणी करून घ्यावी, असे आवाहन देखील करण्यात आले होते.
तपासणी शिबिर दंडवाडी, जैनकवाडी, घाडगेवाडी, चोपडज, जळगाव सुपे, लाटे माळवाडी, डोर्लेवाडी, आर.एस.सुपा, बारामती शहर सुपरस्प्रेडर, जीएमसी सीसीसी या ठिकाणी राबविण्यात आले. यामध्ये दंडवाडी १०५, घाटगेवाडी ५७, जैनकवाडी १०५, चोपडज ३९, जीएमसी सीसीसी १४१, बारामती शहर सुपरस्प्रेडर २२० इतक्या तपासण्या करण्यात आल्या. याठिकाणी एकही पॉझिटिव्ह रुग्ण मिळाला नाही. तसेच जळगाव सुपे १२१ तपासणीमध्ये ०६, लाटे माळवाडीमध्ये ११६ तपासणीमध्ये ०५, आर.एस.सुपा १० तपासणीमध्ये ०१, डोर्लेवाडीमध्ये ०९ तपासणीमध्ये ०१, अशा शहर आणि ग्रामीण भागामध्ये एकूण ९२३ अॅन्टिजन तपासणी करण्यात आल्या. यामध्ये १३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, असे पंचायत समिती आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे.
पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या वतीने सुरू असलेली अॅन्टिजन तपासणी मोहीम.
२९०७२०२१-बारामती-०२