नवीन तयार केलेले रस्ते तीन वर्षांत उखडतातच कसे?
By admin | Published: January 24, 2017 01:16 AM2017-01-24T01:16:28+5:302017-01-24T01:16:28+5:30
खेड तालुक्याच्या पश्चिमेकडील भामनाहेरला जोडणारा एकमेव मार्ग असणाऱ्या कळमोडी रस्त्याची कित्येक वर्षे दुरुस्ती न झाल्याने
डेहणे : खेड तालुक्याच्या पश्चिमेकडील भामनाहेरला जोडणारा एकमेव मार्ग असणाऱ्या कळमोडी रस्त्याची कित्येक वर्षे दुरुस्ती न झाल्याने दुर्दशा झाली आहे.
डेहणेमार्गे आंबोली परिसरातील अनेक गावांना जोडणारा हा रस्ता आहे. डेहणे येथील महाविद्यालयात या भागातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. या मार्गावर मुळातच राज्य परिवहन महामंडळाच्या बस कमी असतात. खराब रस्त्यामुळे गाड्यांना उशीर होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होत आहे. रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात येणाऱ्या रुग्णांचेही हाल होत आहेत.
धामणगाव, करमोडी ते चिखलगाव येथील रस्ता तर पूर्ण उखडला आहे. गटारे बुजल्यामुळे पावसाने रस्ते वाहून गेले आहेत. या रस्त्यावर अवलंबून असणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बीएसएनएलने केबल लाईन्स टाकण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यांमुळे रस्ता पूर्ण उखडला आहे.