How Are You? मेसेज करून वृद्धाची साडेपाच लखांची फसवणूक
By भाग्यश्री गिलडा | Published: February 9, 2024 06:13 PM2024-02-09T18:13:08+5:302024-02-09T18:13:48+5:30
वृद्धाने मेसेजला प्रतिसाद दिल्यानंतर 'पार्टटाइम जॉब ‘वर्क फ्रॉम होम’ द्वारे चांगले पैसे कमावता येतील, असे सांगण्यात आले
पुणे: "हाऊ आर यू!" मेसेज करून वृद्धाची साडेपाच लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुरुवारी (दि. ८) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या डॉ. प्रकाश गणेश बेंद्रे (७७) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. अधिक माहितीनुसार हा प्रकार १ फेब्रुवारी २०२४ ते ८ फेब्रुवारी २०२४ यादरम्यान घडला आहे. फिर्यादींना अनोळखी मोबाइल क्रमांकावरून एक मेसेज आला. (हाय! हाऊ आर यु?" असा मेसेज होता. फिर्यादींनी मेसेजला प्रतिसाद दिल्यावर "पार्टटाइम जॉब ‘वर्क फ्रॉम होम’द्वारे चांगले पैसे कमावता येतील", असे त्यात म्हटले हाेते. वेगवेगळे टास्क दिले जातील ते पूर्ण केल्यास दिवसाचे बाराशे ते पंधराशे रुपये मिळतील, असेही सांगितले. फिर्यादींनी होकार दिल्यावर त्यांना एका अनोळखी ग्रुपमध्ये ऍड केले. त्यानंतर वेगवगेळे टास्क देऊन ते पूर्ण करण्यास सांगितले. सुरुवातीला मोबदला देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर गुंतवणुकीचे आमिष दाखवून प्रीपेड टास्क केल्यास अधिक मोबदला मिळेल असे सांगितले. एकूण ५ लाख लाख ६० हजार रुपये भरण्यास भाग पाडले. पैसे भरूनही परतावा न मिळाल्याने विचारणा केली असता ग्रुपमधून काढून टाकले. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक अंकुश चिंतामण पुढील तपास करीत आहेत.