कशीय आता तब्येत? गिरीश बापट यांच्या तब्येतीची शरद पवारांकडून विचारपूस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 01:24 PM2022-09-18T13:24:43+5:302022-09-18T13:25:12+5:30
राजकीय आरोप-प्रत्यारोप बाजूला सारून दोघांनीही प्रेमळ संवाद केला
पुणे: कशीय आता तब्येत?, बरीय साहेब आता! असा संवाद राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्यात शनिवारी झाला. राजकीय आरोप-प्रत्यारोप बाजूला सारून दोघांनीही प्रेमळ संवाद केला. पवार यांनी बापट यांच्याशी हस्तांदोलन करून आपुलकीने विचारपूस केली. त्याचीच चर्चा रंगली होती.
पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या रौप्य महोत्सव वर्षानिमित्त आयोजित विश्वस्त परिषदेला शनिवारी पुण्यात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, खासदार गिरीश बापट, अंकुश काकडे आदी उपस्थित होते. गिरीश बापट खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील काही दिवसांपूर्वी रुग्णालयात जाऊन त्यांची चौकशी केली होती. पुणे जिल्ह्यात पवारांचे वर्चस्व असताना बापट यांनी आपले कार्यरत राहून वेगळे स्थान निर्माण केले आहे. पवार आणि बापट यांच्यात पूर्वीपासून चांगले संबंध असल्याने त्यांच्यातील हा आपुलकीचा संवाद उपस्थितानाही भावला.