एका रात्रीत मतांचा टक्का लाखांपार पोहोचतोच कसा? काँग्रेसचा सवाल

By राजू इनामदार | Published: December 11, 2024 05:18 PM2024-12-11T17:18:44+5:302024-12-11T17:19:37+5:30

बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन

How can the percentage of votes reach millions in one night? Congress question | एका रात्रीत मतांचा टक्का लाखांपार पोहोचतोच कसा? काँग्रेसचा सवाल

एका रात्रीत मतांचा टक्का लाखांपार पोहोचतोच कसा? काँग्रेसचा सवाल

पुणे : पराभूत पक्षांनाच नाही तर राज्यातील मतदारांसाठीही विधानसभेचा निवडणूक निकाल धक्कादायक वाटत आहे. पारदर्शकता राहावी यासाठी बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे, अशी मागणी करत काँग्रेसच्या शहर शाखेने नवी पेठेत बुधवारी सकाळी आंदोलन केले. नागरिकांच्या स्वाक्षऱ्याही घेण्यात आल्या.

काॅंग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, शहरात ठिकठिकाणी अशी मोहीम राबवण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मतदानाच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता ५८.२२ टक्के मतदान झाले, त्याच रात्री ११:३० वाजता ते ६५.०२ टक्के आणि दुसऱ्या दिवशी २१ नोव्हेंबर रोजी हेच मतदान ६६.०५ टक्के झाल्याचे सांगितले जाते, यात एकूण ७.८३ टक्के मतदान वाढल्याचे स्पष्ट दिसत आहे. तब्बल ७६ लाख मतांची ही वाढ झाली असून, मतदानाचा टक्का इतका कसा वाढला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, दीप्ती चवधरी, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, रफिक शेख, अजित दरेकर, लता राजगुरू, गोपाळ तिवारी, हनुमंत पवार, सुनील शिंदे, राज अंबिके, सुनील घाडगे, ब्लॉक अध्यक्ष हेमंत राजभोज, अक्षय माने, सुजित यादव, आसिफ शेख, रमेश सोनकांबळे, राजू ठोंबरे, सतीश पवार, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे व काँग्रेसचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

Web Title: How can the percentage of votes reach millions in one night? Congress question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.