सुमार दर्जाचे लोक मोठ्या पदावर कसे जातात? सरोदेंची शांतीश्री पंडित यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका
By श्रीकिशन काळे | Updated: February 15, 2025 19:53 IST2025-02-15T19:50:42+5:302025-02-15T19:53:04+5:30
अहो, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का ? उजवे असू द्या, डावे असू द्या, मधले असू द्या, - असीम सरोदे

सुमार दर्जाचे लोक मोठ्या पदावर कसे जातात? सरोदेंची शांतीश्री पंडित यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका
पुणे : ‘‘सुमार दर्जाचे लोकं केवळ पीएच.डी. झाल्यामुळे मोठे होऊ शकतात का ? या पुण्यातील एक शांतीश्री पंडित नावाच्या महिला, ज्यांच्यात शांतीही नाही आणि त्या पंडितही नाहीत, तिला ‘जेएनयू’चे कुलगुरू केले, तिने काल पुण्यात भाषण केले, त्यात सांगितले की, विद्यापीठात डावे चळवळीचे लोक अधिक आहेत. अहो, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का ? उजवे असू द्या, डावे असू द्या, मधले असू द्या,’’अशी टीका सामाजिक कार्यकर्ते व विधीतज्ज्ञ ॲड. असीम सरोदे यांनी केली.
‘आंतर भारती’, पुणे आणि 'गोल्डनपेज पब्लिकेशन' तर्फे संविधान जागर ग्रंथमालिकेतील पुस्तकांच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. शांतीश्री पंडित या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विभागप्रमुख होत्या. त्या दोन वर्षांपासून ‘जेएनयू’मध्ये कुलगुरू आहेत. शांतीश्री पंडित भाषणात म्हणाल्या होत्या की, मी पक्की संघाची आहे आणि संघामुळेच मी कुलगुरूपदी विराजमान झाले.’’ यावरून चांगलीच चर्चा पुण्यात रंगली. त्यांचा समाचार सरोदे यांनी देखील या कार्यक्रमात घेतला.
सरोदे म्हणाले, त्या भाषणात म्हणाल्या की, जय श्रीराम बोला. आम्ही नाही बोललो तर काही प्रॉब्लेम आहे का ? खरंतर त्या कुलगुरू आहेत, त्यांनी धार्मिक बोलण्यापेक्षा जेएनयू मध्ये विद्यार्थ्यांनी काही चांगले प्रयोग केले, तर त्यावर बोललेे पाहिजे. त्यांनी तिथे काही चांगले शैक्षणिक काम केले असेल तर त्याबद्दल बोलावे. ते काम इथल्या विद्यापीठाने करावे, राज्यात सर्वांनी करावे, असे त्यांनी बोलणे अपेक्षित आहे. ‘जय श्रीराम’ बोला आणि ‘इन्शा अल्ला’ बोलू नका, हे त्यांनी सांगितले म्हणे ! या सुमार दर्जाच्या लोकांमुळे आपण संविधानाबद्दल बोललं तरी गुन्हेगार ठरवले जाऊ. आज खरंतर संविधानिक नैतिकतेबद्दल बोलायला जागा राहिली नाही.’’
संविधानाबद्दल सरोदे म्हणाले, संविधानाची तत्वे पाळण्याचे कार्य लोकांचे आहे, तसेच ते नेत्यांचे आहे. नेते संविधान हातात घेऊन दाखवतात. संसदेत एक नेता विचारतो की, संविधानात पाने किती? खरं तर पुस्तक तयार करताना ते कलोकशाही विरोधी घ्यायची, सरकारी संस्थांच्या मदतीने हैदोस घालायचा. तपास यंत्रणा हाताशी घेता आणि कोणाला अटक केली तर त्यांना का अटक केली, ते सांगत नाहीत. मुलभूत हक्कांची जबाबदारी ज्यांच्यावर आहेत, त्यांचे कर्तव्य सांगायला हवे.’’मी जास्त पाने होऊ शकतात. तरी असा प्रश्न विचारणारे नेते संसदेत करतात, हे लाजिरवाणे आहे. इतरांची अप्रतिष्ठा करणारे लोक संसदेत जातात, त्यांचे काय करायचे? हा संसदेचा अपमान नाही का ?,’’ असा सवाल सरेादे यांनी उपस्थित केला.