आणखी किती बळी गेल्यानंतर दुभाजकाची उंची वाढणार? 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 01:39 PM2019-07-22T13:39:03+5:302019-07-22T13:40:11+5:30

पुणे- सोलापूर महामार्गावर केवळ दुभाजकाची उंची कमी असल्यामुळे अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत.

How many more death after will increase the height of the divider? | आणखी किती बळी गेल्यानंतर दुभाजकाची उंची वाढणार? 

आणखी किती बळी गेल्यानंतर दुभाजकाची उंची वाढणार? 

Next

लोणी काळभोर : वर्षाविहार करून मोटारीने घरी परतत असलेल्या यवत (ता. दौंड) येथील नऊ तरुण पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत शनिवारी (दि. २०) पहाटे केवळ दुभाजकाची उंची कमी असल्यामुळे वाहन रस्ता दुभाजकावरून पलीकडे गेले, म्हणून मृत्युमुखी पडले. हा अपघात केवळ रस्ता दुभाजकाची उंची कमी होती, या कारणावरून झाला असून आणखी किती निरपराध्यांचे बळी गेल्यानंतर याची उंची वाढणार? असा सवाल सर्वसामान्यांकडूनउपस्थित केला जात आहे.  
 विशेष म्हणजे शनिवारी (दि. ११ मार्च २०१७) उरुळीकांचननजीकच्या इनामदारवस्ती येथे मुंबई (मुलुंड) येथील ११ भाविक देवदर्शनाला अक्कलकोट येथे जात असताना पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास मिनी बससमोर रानडुक्कर आडवे आल्याने त्याला चुकवण्याच्या नादात बस रस्ता दुभाजकावरून विरुद्ध दिशेला गेली व ट्रकला धडकल्याने झालेल्या अपघातांत बसचालकांसह प्रवासी असे एकूण ११ जण मृत्युमुखी पडले. या ठिकाणी मोठी लोकवस्ती असतानाही रस्त्याच्या कडेला जाळ्या नाहीत. त्या असत्या तर रानडुक्कर महामार्गावर आले नसते व ११ निरपराध्यांचा बळी गेला नसता. तसेच रस्ता दुभाजकाच्या कमी उंचीमुळे ती बस त्यांवर चढून विरुद्ध दिशेस गेली, या रस्ता दुभाजकाची उंची जास्त असती तरी या अपघाताची तीव्रता कमी होऊन काही जणांचे प्राण नक्कीच वाचले असते. या दोन्ही अपघातांत कमी उंचीचे दुभाजक हे एकच साम्य असल्याने सर्वसामान्यांकडून हा सवाल उपस्थित केला जात आहे.   
कवडीपाट टोलनाका (ता. हवेली) ते यवत (ता. दौंड) या भागातील रस्त्याचे काम आयआरबी (आयडियल रोड बिल्डर) या कंपनीने बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर केले असून सन २००४ पासून टोलवसुलीचे काम जोरदारपणे चालू होते. मार्च २०१९ मध्ये याची मुदत संपली. परंतु या कालावधीत प्रवाशांना आवश्यक त्या सोई-सुविधा देण्याबाबत ती कंपनी कधीच गंभीरपणे काम नसल्याने अनेकांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे. आयआरबी कंपनीला कवडीपाट ते यवत या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम मिळाले होते.

 सत्तावीस किलोमीटरच्या कामासाठी त्यावेळी ८८ कोटी रुपयांचे बजेट तयार करण्यात आले होते. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सन २००४ पासून या कंपनीने टोलवसुलीचे काम सुरू केले आहे. शासनाने या कंपनीला १९ वर्षे टोलवसुली करण्याची परवानगी दिली होती. या टोलची कवडीपाट (ता. हवेली) व कासुर्डी (ता. दौंड) या दोन ठिकाणी वसुली केली. परंतु ज्या गंभीरपणे कंपनीने टोलवसुली केली, त्या तुलनेत प्रवाशांना सुविधा मात्र मिळाल्या नाहीत. या महामार्गावरून दररोज हजारो गाड्या ये-जा करतात; परंतु कवडीपाट टोलनाका ते कासुर्डी टोलनाका, यवत या २७ किलोमीटर अंतरामध्ये एकही शौचालय उभारण्यात आलेले नसल्याने पुरुष प्रवासी आपले नैसर्गिक विधी रस्त्याच्या कडेला उरकून घेतात, परंतु महिला प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय होते, याकडे टोल कंपनीने अजिबात लक्ष दिले नाही. मुदत संपल्यामुळे कंपनीने हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे हस्तांतरित केला आहे.  

या महामार्गाचा ताबा कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित केला. तत्पूर्वी कंपनीने रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या पदपथावरील चोरीस गेलेल्या जाळ्या पुन्हा बसवल्या आहेत. परंतु त्याच्या गुणवत्तेबाबत सर्व जण साशंक आहेत. कारण बºयाच ठिकाणच्या जाळ््या अवघ्या दोन महिन्यांंत गायब झाल्या आहेत. तुटलेले लोखंडी अँगल पदपथावर असल्याने, तसेच महामार्गावर दुतर्फा मातीचे साम्राज्य पसरले असल्याने दुचाकीस्वारांचा धडकून किंवा घसरून अपघात होऊन गंभीर जखमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्ता दुभाजकाची उंची काही ठिकाणी वाढवली आहे. 
.........
रस्त्याची डागडुजी व इतर कामे केली आहेत? ती कामे करीत असताना महामार्गावर खडी व डांबरीकरण करण्यात आल्याने अगोदरच लहान असलेले रस्ता दुभाजक आणखी लहान झाले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी त्यांची उंची ६ इंच व काही ठिकाणी अवघ्या ४ इंचांवर आली आहे. या महामार्गावर थेट सोलापूरपर्यंत वेडीवाकडी वळणे नसल्याने वाहने अधिक वेगाने जातात. रात्रीच्या वेळी त्यात वाढ होते व पुढे जाण्याच्या प्रयत्नात अपघात होतात, याचा विचार करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याचा विचार करून रस्ता दुभाजकाची उंची वाढवणे गरजेचे आहे. अन्यथा यापुढेही एखादे वाहन भरधाव वेगात आले अन् त्याला पुढे अडथळा निर्माण झाला तर थेट ते दुभाजक ओलांडून पलीकडे जाणार व अपघाताच्या तीव्रतेत वाढ होणार, यांमुळे अनेक जण प्राणास मुकणार, ही काळ्या दगडावरची रेघ ठरणार आहे. 
महामार्गालगत असलेल्या बाजूपट्ट्यांमध्ये मुरुम भरला असला तरी तो पाणी टाकून व्यवस्थित थांबला नसल्याने जाड मुरुमाने आपले डोके वर काढले असल्याने दुचाकीस्वारांना, तो ‘नसून अडचण असून अडथळा’ ठरत आहे. या महामार्गावर कवडीपाट ते उरुळीकांचनपर्यंत वाहतूककोंडीच्या समस्येस कायम सामोरे जावे लागते. त्यामुळे वेळ व इंंधनाचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. महामार्गालगत उभे राहत असलेले मोठमोठे बांधकाम प्रकल्प, व्यवसाय व मंगल कार्यालय आदींमुुळे वाहतुकीचा अतिरिक्त ताण महामार्गावर येत असल्याने पथकरवसुली थांबली असली, तरी वाहनकोंडीची बाब नित्याची ठरली आहे. 
४याचबरोबर टोल बंंद होऊन दोन महिने उलटून गेले तरी आजतागायत दोन्ही टोलनाक्यांवर टोलवसुली करण्यासाठी उभारण्यात आलेले बूथ ‘जैसे थे’ आहेत. तसेच गतिरोधक काढण्यात आलेले नाहीत. या दोन्ही ठिकाणची विद्युतव्यवस्था खंडित करण्यात आल्याने वाहनचालकाला याचा अंदाज येत नाही. परिणामी वाहन आदळून नुकसान होते. म्हणून हे बूथ व गतिरोधक तत्काळ काढून टाकावेत, या मागणीने जोर धरला आह
..........
 

Web Title: How many more death after will increase the height of the divider?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.