फडणवीसांच्या मंत्रिमंडळात पुण्याचे किती कारभारी?

By admin | Published: October 29, 2014 12:23 AM2014-10-29T00:23:55+5:302014-10-29T00:23:55+5:30

भारतीय जनता पक्षाचे मंत्रिमंडळ देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तयार होत असताना या मंत्रिमंडळात पुण्यातून किती कारभा:यांना संधी मिळणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

How many stewards of Pune in Fadnavis cabinet? | फडणवीसांच्या मंत्रिमंडळात पुण्याचे किती कारभारी?

फडणवीसांच्या मंत्रिमंडळात पुण्याचे किती कारभारी?

Next
पुणो : भारतीय जनता पक्षाचे मंत्रिमंडळ देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तयार होत असताना या मंत्रिमंडळात पुण्यातून किती कारभा:यांना संधी मिळणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. 
राज्यात नागपूरपाठोपाठ पुण्याने भाजपाला सर्वाधिक पाठिंबा दिला आहे. पुण्याने ‘शत प्रतिशत भाजप’चा नारा देत सर्वच्या सर्व आठ आमदार निवडून दिले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात पुण्याचा दावा प्रबळ असणार आहे. सलग पाच वेळा निवडून गेलेले गिरीश बापट हे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक ज्येष्ठ आमदार आहेत. तर, दिलीप कांबळे यांनी युती शासनाच्या काळात 
मंत्रिपद सांभाळले आहे. याशिवाय महिला प्रतिनिधी म्हणून पुण्यातून सर्वाधिक मतांनी निवडून गेलेल्या माधुरी मिसाळ यांचाही विचार होऊ शकतो. 
जिल्ह्यातून भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे राहुल कुल निवडून आले आहेत. पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी स्वत: मंत्रिपद स्वीकारले नाही, तर कुल यांना संधी मिळू शकते. याशिवाय आजर्पयत भारतीय जनता पक्षाला सातत्याने साथ देणा:या मावळ मतदारसंघातून दुस:यांदा निवडून गेलेले आमदार बाळा भेगडे यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो. 
गेल्या 15 वर्षात राज्याच्या मंत्रिमंडळात पुण्याला अत्यंत तोकडे प्रतिनिधित्वच मिळाले आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, कॉँग्रेसचे हर्षवर्धन पाटील हे प्रभावी नेते जिल्ह्यातील असल्याने त्यांनाच संधी मिळत गेली. कॉँग्रेसने चंद्रकांत छाजेड, बाळासाहेब शिवरकर, रमेश बागवे यांना संधी दिली. 
1995 मध्ये  राज्यात शिवसेना- भाजपाची सत्ता आल्यानंतर शिवसेनेकडून शशिकांत सुतार आणि भाजपकडून दिलीप कांबळे यांना कॅबीनेट मंत्रीपद मिळाले होते.  तर विजय काळे यांना म्हाडाच्या पुणो विभागाच्या अध्यक्षपदी संधी मिळाली होती.  (प्रतिनिधी
 
ज्येष्ठ मंत्री हा पालकमंत्री होत असल्याने शहराचे अनेक प्रश्न प्रलंबित राहिले. पालकमंत्री हे अनेक समित्यांचे  अध्यक्ष असल्याने शहराच्या विकासाला गती मिळत नाही. जिल्ह्यात भाजपाचे दोन आणि मित्र पक्षाचा एक असे तीन, तर शहरात मात्र आठ आमदार आहेत. त्यामुळे यंदा पुणो शहराला या पदावर संधी मिळेल. 
 
गिरीश बापट यांना मंत्रिपद मिळाल्यास तेच पालकमंत्री होतील, यात शंका नाही. मात्र, विधानसभा तालिकेवरील सदस्य असलेल्या बापट यांना विधानसभा अध्यक्षपदाचा मान दिल्यास पालकमंत्रिपदाबाबत प्रश्न येऊ शकतो. 
 भाजपांतर्गत राजकारणातही पुण्यावर वर्चस्व ठेवणो महत्त्वाचे आहे. त्यामुळे मुंबईतील एखाद्या नेत्याचीही या पदावर वर्णी लागू शकते. युतीच्या काळात प्रमोद नवलकर हे पुण्याचे पालकमंत्री होते. 
 
पुण्याच्या प्रश्नांना मिळणार का गती? 
 मेट्रो :
पुणो आणि पिंपरी- चिंचवडमधील मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला केंद्र सरकारने  तत्त्वत: मंजुरी दिली आहे.त्यासाठी एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण स्थापना करण्याची आणि र्सवंकष प्रादेशिक वाहतूक आराखडा जाहीर करण्याची अट घालण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी पीएमपीकडील बसची संख्याही वाढविण्यास सांगितले आहे. केंद्र आणि राज्यात भाजपाचे सरकार असल्याने याला गती मिळेल. 
 
  एसआरएची नियमावली 
झोपडपट्टी विकास प्राधिकरणाची (एसआरए) नियमावली गेल्या अनेक महिन्यांपासून रखडली आहे. पुण्यात सुमारे 564 झोपडपट्टय़ा आहेत. त्यात 4क्  टक्क्यांहून  अधिक नागरिक राहतात. नियमावली लवकर तयार झाली, तर केवळ पुण्यातीलच नव्हे, तर राज्यातील झोपडपट्टय़ांच्या पुनर्विकासाचाही मार्ग मोकळा होणार आहे. 
 
पीएमआरडीएची मंजुरी 
पुणो प्रादेशिक महानगर विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) स्थापना झाल्यास पुणो आणि पिंपरी- चिंचवड महापालिका, शहरातील तिन्ही कॅन्टोन्मेंट बोर्ड, जिल्हा परिषद यांच्या क्षेत्नातील विकासाची प्रक्रिया सुरू होणार आहे. महानगरांतच सध्या होणारा विकास ग्रामीण भागातही पोचण्यासाठी आणि महानगराच्या विकेंद्रीकरणासाठी ‘पीएमआरडीएची आवश्यकता आहे. त्यातून वाहतुकीच्या समस्या सुटण्याबरोबरच उद्योगांसाठीच्या पायाभूत सुविधाही निर्माण होणार आहे. 

 

Web Title: How many stewards of Pune in Fadnavis cabinet?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.