किती ही लूट? मार्केट यार्डात पडवळ १२ रुपये तर घराजवळ ४० रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:11 AM2021-07-30T04:11:13+5:302021-07-30T04:11:13+5:30

(स्टार ९८६ डमी) पुणे : प्रत्येक शहरात होलसेल दरांत भाजीपाला मिळण्याचे एक ठिकाण ठरलेले असते. त्या ठिकाणी स्वस्तात कांदा ...

How much loot? Padwal in the market yard is Rs. 12 and Rs. 40 per kg near the house | किती ही लूट? मार्केट यार्डात पडवळ १२ रुपये तर घराजवळ ४० रुपये किलो

किती ही लूट? मार्केट यार्डात पडवळ १२ रुपये तर घराजवळ ४० रुपये किलो

Next

(स्टार ९८६ डमी)

पुणे : प्रत्येक शहरात होलसेल दरांत भाजीपाला मिळण्याचे एक ठिकाण ठरलेले असते. त्या ठिकाणी स्वस्तात कांदा ग्राहकांना उपलब्ध होत असतो. पुणे शहरातील मार्केट याडार्तही तसा होलसेल भाजीपाला मिळत आहे. मात्र, शहराच्या वेगवेगळ्या भागात हाच कांदा दुप्पट-तिप्पट दराने विकला जात आहे. मार्केट यार्डात पडवळ १२ रुपये किलो भावाने सर्वसामान्यांना मिळतो. तर आपल्या घराजवळच्या परिसरात हीच पडवळ ४० किलो दराने मिळत आहे. त्यामुळे स्थानिक भागातील किरकोळ विक्रेते मात्र तिप्पट दराने विक्री करत ग्राहकांची लूट करत असल्याचे चित्र आहे.

प्रत्येक शहरात होलसेल दरांत भाजीपाला मिळण्याचे एक ठिकाण असते. या ठिकाणी असलेला भाजीपाला दर आणि बाहेर किरकोळ बाजारात असलेला दर यामध्ये प्रचंड तफावत दिसते. सर्वसामान्य ग्राहकांना मार्केट यार्डसारख्या मोठ्या होलसेल बाजारात येणे शक्यता होत नाही. त्यामुळे या ग्राहकांना मात्र प्रचंड आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. होलसेल भावापेक्षा तिप्पट दराने भाजीपाल्याची खरेदी करावी लागत आहे.

-----

१) हा बघा दरांमधील फरक (प्रती किलो दर)

भाजीपाला-मार्केट यार्ड-घराजवळ

पडवळ - १२ - ४०

कांदा - १० - ३०

भेंडी - १० - ३०

गवार २० ३५

टेमॅटो ०६ २५

मटार २५ ६०

घेवडा २५ ६०

दोडका १० ३०

काकडी ०६ २०

कारली १५ ३५

फ्लॉवर ०५ २०

कोबी ०५ २०

वांगी १५ ४०

ढाेबळी ०६ ३०

पावटा २० ४०

-----

* माकेर्ट यार्डात कांदा १० रुपये, चंदननगरला ३० रुपये किलो

मार्केट यार्डातील होलसेल बाजारात कांदा १० रुपये किलोने ग्राहकांना मिळत आहे. तर चंदननगरला हाच कांदा किरकोळ बाजारात ३० से ३५ रुपये किलोने विकला जात आहे. ही परिस्थिती केवळ चंदननगरच नाही तर उपनगरातील हडपसर, कोंढवा, मुंढवा, कात्रज, धनकवडी, सिंहगड रोड परिसरात याच पद्धतीने तिप्पट दराने विक्री केली जात आहे.

---- * पिकवतात शेतकरी, जास्तीचा पैसा तिसऱ्याच्याच हातात !

भाजीपाला शेतकरी पिकवून विक्रीसाठी शहरातील मार्केट यार्डात आणताता. या शेतकऱ्यांकडून छोठे-मोठे व्यापारी किरकोळ दराने खरेदी करतात. अनेकदा या शेतकऱ्यांना उत्पादन खर्च आणि माल विक्रीसाठी आणतानाचा वाहनाचा खर्चही निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता हा पैसा न जाता जो शेतकऱ्यांकडून घेऊन ग्राहकांना विकतो. त्यात घेतलेल्या भावापेक्षा ते ग्राहकांना तिप्पट-चौपट दराने विकून गब्बर होत आहे.

------

* एवढा फरक कसा?

मार्केट यार्डातून आम्हाला भाजीपाला आणावा लागतो. त्यामुळे वाहतूक खर्च वाढतो. तो जोडून तसेच आम्ही उदरनिवार्हसाठी चार पैसे मिळावे म्हणून आम्ही व्यवसाय करत आहे. त्यामुळे आम्हाला दर वाढवूनच विकावा लागतो.

- गुनेश लाहोटी, भाजीपाला किरकोळ विक्रेता

-------

* अर्धा-पाव किलोसाठी होलसेल बाजारात जाणे परवडत नाही!

१) आम्ही राहायला केशवनगर येथे आहे. आम्हाला दैनंदिन भाज्या अर्धा-पाव किलो पुरेशा होतात. मार्केट यार्ड आमच्यापासून १५ से २० किलोमीटर आहे. त्यामुळे जाण्या-येण्याचा खर्च परवडत नाही. त्यामुळे घराजवळूनच खरेदी करतो.

- लक्ष्मीबाई राऊत, गृहिणी, चंदननगर

Web Title: How much loot? Padwal in the market yard is Rs. 12 and Rs. 40 per kg near the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.