‘डेल्टा प्लस’ला कसे रोखणार; दोन्ही डोस घेणारे केवळ ८ टक्के !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:09 AM2021-07-02T04:09:22+5:302021-07-02T04:09:22+5:30

पुणे : पुणे जिल्ह्यात आजपर्यंत ४५,७२,८९९ नागरिकांनी पहिला डोस, तर ८,९३,९१३ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. ''डेल्टा प्लस''ची चिंता ...

How to prevent ‘Delta Plus’; Only 8% who take both doses! | ‘डेल्टा प्लस’ला कसे रोखणार; दोन्ही डोस घेणारे केवळ ८ टक्के !

‘डेल्टा प्लस’ला कसे रोखणार; दोन्ही डोस घेणारे केवळ ८ टक्के !

Next

पुणे : पुणे जिल्ह्यात आजपर्यंत ४५,७२,८९९ नागरिकांनी पहिला डोस, तर ८,९३,९१३ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. ''डेल्टा प्लस''ची चिंता सतावत असताना लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज वारंवार वैद्यकतज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात दोन्ही डोस घेतलेल्यांचे प्रमाण केवळ ८ टक्के आहे.

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. देशभरात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, तिसऱ्या टप्प्यात 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, चौथ्या टप्प्यात 45 ते 60 वयोगट तर पाचव्या टप्प्यामध्ये 18 ते 44 या वयोगटातल्या लसीकरण सुरू करण्यात आले. केवळ एक-दोन दिवस विक्रमी लसीकरण होऊन चालणार नाही, तर त्यामध्ये सातत्य बाळगावे लागणार आहे. जिल्ह्यात आजवर सर्वाधिक लसीकरण मुळशी तालुक्यात, तर सर्वात कमी लसीकरण दौंड तालुक्यात झाले आहे.

डेल्टा प्लस विषाणूविरोधात लढायचे असेल तर जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. त्यासाठी लसींचा पुरेसा पुरवठा, दररोजच्या लसीकरणाची संख्या वाढवणे यावर भर देणे गरजेचे आहे. आतापर्यंत दोन्ही डोस घेतलेले आरोग्य कर्मचारी 78 टक्के, अत्यावश्यक कर्मचारी 60 टक्के, 60 वर्षांवरील नागरिक 35 टक्के आहेत. 45-59 या वयोगटातील 14 टक्के नागरिकांनी, तर 18-44 या वयोगटातील 1 टक्के नागरिकांचा दुसरा डोस घेऊन झाला आहे.

----

जिल्ह्यातील लसीकरण - 45,72,899

पहिला डोस - 36,78,983

दुसरा डोस - 8,93,916

केंद्रे - 419

-----------------------

तालुका लाभार्थी टक्के

आंबेगाव 104090 63

बारामती 134641 49

भोर 65489 61

दौंड 93068 38

हवेली 178353 39

इंदापूर 112138 47

जुन्नर 146333 62

खेड 148999 60

मावळ 117449 50

मुळशी 123279 118

पुरंदर 80725 55

शिरूर 125142 47

वेल्हा 29381 96

------

वयोगट पहिला डोस दुसरा डोस

FLW. 123 60

HCW. 109 78

60 वर्षांवरील 80 35

45-59 54 14

18-44 36 1

Web Title: How to prevent ‘Delta Plus’; Only 8% who take both doses!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.