निरामय कसे राहता येईल ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:10 AM2021-03-15T04:10:12+5:302021-03-15T04:10:12+5:30

--- सध्या कोरोनामुळे प्रत्येक जण चिंतेत आहे . सर्वत्र काळजी आणि भिती असे काहीसे संमिश्र वातावरण आहे . ...

How to stay healthy? | निरामय कसे राहता येईल ?

निरामय कसे राहता येईल ?

googlenewsNext

---

सध्या कोरोनामुळे प्रत्येक जण चिंतेत आहे . सर्वत्र काळजी आणि भिती असे काहीसे संमिश्र वातावरण आहे . प्रत्येक व्यक्ती आपल्या परीने निरामय कसे राहता येईल, यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे ...कसे राहता येवू शकेल हो निरामय ? प्रश्न तसा सोपा वाटतो, पण उत्तरे प्रत्येकाची वेगळी असणार ...एखादी सवय बदलणे सांगणे सोपे असते पण प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. अश्याच काही पारंपारिक सवयी अंगी बाणवून घेणे आज अत्यावश्यक आहे.

सर्वात प्रथम ...आपण नित्यक्रम पाहूया ...तपासुया ...उठण्याची वेळ ...शक्य असेल त्यांनी सकाळी लवकर उठणे आवश्यक आहे. उठल्यानंतर आवडीप्रमाणे नित्य व्यायाम केल्यास शरीरास हितकारक ठरत .रोज किमान ४० मिनिटे व्यायाम आवश्यक आहे. प्रत्येकाने आपल्या आवडीप्रमाणे व्यायाम निवडावा. सध्या काय खावे ? हा प्रश्न खूप मोठा राहिला आहे असे वाटत नाही. कारण परिस्थितीने घराचे खाणे शिकवून दिले. मी कायमच पारंपरिक आहार घ्यावा याबाबतीत आग्रही आहे. प्रत्येकाने आपल्या घरात बनणारा ताजा आहार मनसोक्त घ्यावा. भूक लागली की जेवावे ... तहान लागली की पाणी प्यावे ... यात एक गोष्ट टाळावी ती म्हणजे खाण्यावर खाणे.... अनेकजण सध्या घरून काम करत आहे. काम करताना ...कंटाळा आला म्हणून...उगाच भूक लागली नसताना खाणे कटाक्षाने टाळावे. शारीरिक व्यायाम जसा आवश्यक आहे तसा मनाचा विचार सुध्दा आवश्यक आहे. आज अनेक ताण आहेत. प्रश्न आहेत, काळ अवघड आहे. अश्या परिस्थितीत चिडचिड होणे. उदासीनता येणे, नैराश्य येणे ह्या बाबी पाहायला मिळतात. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी प्राणायाम करणे आवश्यक आहे. प्राणायाम केल्याने मनातील विचार नियंत्रित होण्यास मदत होते .नियंत्रण हे हवेच. मग ते मानसिक असो वा शारीरिक आणि त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. शरीर थकते. मन थकते आणि मग येते झोप. रोज मस्त गाढ झोप घेणे गरजेचे आहे. झोप व्यवस्थित असेल तर शरीर आणि मन सुस्थितीत राहते. कामासाठी उत्साह जाणवतो ...झोप येत असताना टीव्ही पाहणे ...अकारण उशीरा रात्री जागरण करणे अश्या गोष्टी टाळाव्यात.थोडक्यात काय ! आपण नेहमीच जे पारंपारिक पद्धतीने पाहत आलो...ज्यात वाढलो ..जे संस्कार मिळाले तेच करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे ....सध्या तंत्रज्ञान खूप विकसित आहे ....पण त्याहीपेक्षा बहुमूल्य असतो परिवार ...आणि आज प्रत्येकास त्याचे महत्त्व पटले आहे .काहीही नसताना अगदी कमी गरजा ठेवून जीवन जगू शकतो हे काळाने शिकविले ...एकमेकांचा सहवास आनंद देतो ...हे या काळाने जाणवून दिले ... जीवनमूल्ये म्हणजे काय हे या काळाने शिकविले ... आणि खऱ्या अर्थाने जीवन जगायला या काळाने शिकविले ...स्वस्थ राहूया ...आणि मस्त निरामय जीवन जगूया

- डॉ. कांचन व्यंकटेश खैराटकर, आयुर्वेद तज्ज्ञ

Web Title: How to stay healthy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.