भाषाभ्यास कसा करावा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:10 AM2021-05-07T04:10:59+5:302021-05-07T04:10:59+5:30
याचंही उत्तर अगदी सोप्पं आहे. आपल्या घरात वर्तमानपत्रे,मासिके,गोष्टीची पुस्तके असतात.नियमित त्यांचे वाचन करा.नियमित बातम्या वाचा.मुलाखती पहा ,वाचा.तुमच्या या वयात ...
याचंही उत्तर अगदी सोप्पं आहे. आपल्या घरात वर्तमानपत्रे,मासिके,गोष्टीची पुस्तके असतात.नियमित त्यांचे वाचन करा.नियमित बातम्या वाचा.मुलाखती पहा ,वाचा.तुमच्या या वयात तुमची श्रवण,भाषण, वाचन कौशल्ये विकसित व्हायला हवीत.पाचवीपासून पुढे नियमित वाचनाचा प्रभाव तुमच्या भाषेवर झालाय हे तुमच्या लेखनातून जाणवते.
याचा उपयोग केव्हा होतो माहीत आहे??
तुम्ही भाषिक कौशल्यावर आधारित प्रश्न सोडविता ना तेव्हा.....निबंध लेखन,गोष्ट लेखन,जाहिरात लेखन, वृत्तांत लेखन,बातमी लेखन,मुलाखत लेखन हे प्रश्न सगळ्याच भाषांमध्ये असतातच.आपण ते सोडवतोही...पण बाळांनो ,आपलं लेखन प्रभावशाली व्हावं असं वाटत असेल तर भाषा अलंकारिक असावी.मनाचा ठाव घेणारी असावी म्हणजे तुम्हाला तो प्रश्न उत्तमरीत्या सोडविता येतोय असं वाटेल.
आणखी एक...तुमच्या पाठ्यपुस्तकात खूप छान छान कविता असतात.अर्थपूर्ण आशय असलेल्या कवितांचा आस्वाद घ्यायचा...म्हणजे काय??? ...हेही सोपं आहे.कविता आधी समजावून घ्या.आशय समजून घ्या.चाल शिक्षकांनी लावूनच दिलेली असते.ती लक्षात घेऊन तशीच कविता म्हणा. हावभाव करून जेव्हा तुम्ही कविता म्हणता ना तेव्हा तर तीची गोडी अजूनच वाढते.घरातील सगळ्या मोठ्यांनाही त्या ,हावभाव करून म्हणून दाखवा. भाषा आनंद आहे.तो अनुभवायला शिका.
भाषाभ्यासाचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे व्याकरण.भाषेचे व्याकरण हा तिचा आत्मा असतो.भाषेनुसार व्याकरणाचे नियम वेगवेगळे असले तरी एका भाषेतील व्याकरणाचे नियम ध्यानात आले की इतर भाषांचेही आपसूकच उमगतात.त्यामुळे ते व्यवस्थित समजून घ्या.गरज पडल्यास शिक्षक किंवा घरातील मोठ्या माणसांची मदत घ्या. वाचन करा.चांगल्या गोष्टी ऐका.शुद्ध भाषेत बोला.मग बघा तुम्हाला भाषाभ्यासाची किती गोडी लागते.
आत्ता वेळ आहे त्याचा सदुपयोग करा.तुमचे हस्ताक्षर सुधारा.त्यासाठी प्रयत्न करा.सुदंर हस्ताक्षर म्हणजे सुरेख दागिना असतो.दागिने व्यक्तीचे सौंदर्य वाढवितात.सुंदर हस्ताक्षर व्यतीच्या व्यक्तिमत्वाचे सौंदर्य वाढविते.आपलं व्यक्तिमत्त्व आपण घडवायचं असतं.
चला तर मग एका नव्या दृष्टिकोनातून भाषेच्या अभ्यासाकडे पाहू या. तिची गोडी अनुभवूया.....
सौ. प्राजक्ता प्रशांत मुरमट्टी
सर,लेख वाचून बदल सुचवावा ही विनंती...