बहि:स्थ विद्याथ्र्यानी अभ्यास करावा कसा?
By admin | Published: December 9, 2014 12:20 AM2014-12-09T00:20:18+5:302014-12-09T00:20:18+5:30
सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठामध्ये वाढीव शुल्क देवून बहि:स्थ अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्याथ्र्याना अद्याप शैक्षणिक साहित्य (अभ्यास पुस्तिका) उपलब्ध करून दिले गेले नाही.
Next
पुणो : सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठामध्ये वाढीव शुल्क देवून बहि:स्थ अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्याथ्र्याना अद्याप शैक्षणिक साहित्य (अभ्यास पुस्तिका) उपलब्ध करून दिले गेले नाही. परिणामी कोणत्या विषयातील कोणत्य घटकांचा अभ्यास करावा, असा प्रश्न विद्याथ्र्यासमोर उभा राहिला आहे. त्यामुळे विद्यापीठाने विद्याथ्र्याना तात्काळ शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून द्यावे, अन्यथा वाढविलेले शुल्क तात्काळ कमी करावे, अशी मागणी विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यांकडून केली जात आहे.
विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांना बहि:स्थ विद्याथ्र्याच्या परीक्षा घेताना अनेक अडचणींना सामोर जावे लागत होते. तसेच महाविद्यालयांना नियमित विद्यार्थी मिळत नसल्यामुळेच बहि:स्थ विद्याथ्र्याच्या शुल्कवाढीचा घाट घातला गेला, असे आरोप विद्यार्थी संघटना व विद्यापीठाच्या काही पदाधिका-यांकडून केला जात होता. परंतु, विद्यापीठाने बहि:स्थ अभ्यासक्रमाची शुल्कवाढ करून त्याबदल्यात विद्याथ्र्याना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. बहि:स्थ विद्याथ्र्यानी कोणत्या संदर्भ ग्रंथांच्या आधारावर परीक्षेचा अभ्यास करावा,त्याबाबतची यादी सध्या विद्यापीठातर्फे प्रसिध्द केली जाते. परंतु, केवळ संदर्भ ग्रंथांच्या आधारावर अभ्यास करणो विद्याथ्र्याना अवघड जाते.त्यामुळे विद्यापीठाने तात्काळ शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी विद्याथ्र्यानी केली आहे.
विद्यापीठाने शैक्षणिक साहित्य तयार करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. तसेच प्रत्येक विषयाचे शैक्षणिक साहित्य तयार करण्यासाठी तज्ज्ञ प्राध्यापकांची नियुक्ती केली आहे. परंतु, हे काम खूप संथ गतीने सुरू आहे. विद्याथ्र्याची परीक्षा येत्या एप्रिल/ मे महिन्यात घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे परीक्षेपूर्वी किमान तीन महिने आगोदार हे साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली जात आहे. (प्रतिनिधी)
बहि:स्थ पध्दतीने शिक्षण घेवू इच्छिणारे गरीब विद्यार्थी विद्यापीठ प्रशासनाने वाढविलेल्या बेसुमार शुल्कामुळे शिक्षणापासून वंचित राहत आहेत. विद्यापीठाने आपली आडमुठी भूमिका सोडन शुल्क कमी करावे, तसेच विद्याथ्र्याना शैक्षणिक साहित्य तात्काळ उपलब्ध करून द्यावे. शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देता येत नसेल तर विद्याथ्र्याकडून घेतलेले वाढीव शुल्क परत करावे.तसेच विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.वासुदेव गाडे यांनी यात लक्ष घालून प्रश्न मार्गी लावाला.
- संतोष ढोरे, अधिसभा सदस्य, सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठ