कसा ओळखायचा 'Good Touch' आणि 'Bad Touch'; समजावून सांगा आपल्या चिमुकल्यांना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 01:24 PM2022-03-18T13:24:12+5:302022-03-18T13:28:36+5:30

याबद्दलची माहिती आपल्या चिमुकल्यांना सांगणे गरजेचे आहे....

how to recognize good touch and bad touch explain to your kids | कसा ओळखायचा 'Good Touch' आणि 'Bad Touch'; समजावून सांगा आपल्या चिमुकल्यांना

कसा ओळखायचा 'Good Touch' आणि 'Bad Touch'; समजावून सांगा आपल्या चिमुकल्यांना

googlenewsNext

पुणे : शेजारी राहणाऱ्या दादाने चॉकलेटचे आमिष दाखवून एका ६ वर्षांच्या मुलीला घरात बोलविले. तिला चॉकलेट देऊन तिच्या शरीराशी तो खेळू लागला. काही दिवस हा प्रकार सुरू राहिला. एके दिवशी तिच्या पोटात दुखू लागले, म्हणून आईने तिला डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांना शंका आल्यावर त्यांनी या मुलीकडे विचारपूस केली. तेव्हा शेजारी राहणारा दादा काय करतो हे तिने सांगितले. हिच्यासारख्या मुलींना गुड टच, बॅड टचची माहितीच नसते. (difference between good touch and bad touch)

अशा अनेक घटना आता समोर येऊ लागल्या आहेत. अनेकदा नकळत्या वयातील मुली घरी अशा गोष्टी सांगू शकत नाही. शाळेमध्ये घेण्यात येणाऱ्या कार्यशाळेमधून अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. काही वेळा तर पीडित मुलीचा बाप, जवळचे नातेवाईकच अशी कृत्ये करीत असल्याचे आढळून आले.

२०२१ मधील बलात्कार : २२९

२०२१ मधील विनयभंग : ३८५

काय आहे गुड टच?

मुलांना आई-बाबा किंवा एखादी जवळची व्यक्ती प्रेमाने, चांगल्या उद्देशाने स्पर्श करत असेल तर त्याला गुड टच असे म्हणता येईल. त्या स्पर्शातून प्रेमाची, आपलेपणाची, काळजीची आणि सुरक्षिततेची भावना मनात निर्माण होते. आईने प्रेमाने मिठी मारणे, जवळच्या व्यक्तीने शाबासकी देणे म्हणजे गुड टच.

काय आहे बॅड टच?

एखादी व्यक्ती आपल्याला वाईट हेतूने स्पर्श करण्याचा प्रयत्न करते. शरीराच्या कोणत्याही भागावरून वारंवार हात फिरवणे, गुप्त अवयवांना स्पर्श करण्याचा प्रयत्न म्हणजे बॅड टच अर्थात वाईट स्पर्श. अशा स्पर्शाने आपल्याला भीती वाटते, अस्वस्थ वाटते. आपल्या एखाद्या अवयवाला स्पर्श करून कोणाला सांगू नको असे सांगितले जात असेल तर तो वाईट स्पर्श आहे.

Web Title: how to recognize good touch and bad touch explain to your kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.