एचपी लीगमध्ये एचपी रॉयल्स, सिंबा वॉरियर्स उपांत्य फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:22 AM2021-02-05T05:22:01+5:302021-02-05T05:22:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : हेमंत पाटील ग्रुप यांच्या वतीने आयोजित एचपी महिला प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत एचपी ...

HP Royals, Simba Warriors in the semifinals in the HP League | एचपी लीगमध्ये एचपी रॉयल्स, सिंबा वॉरियर्स उपांत्य फेरीत

एचपी लीगमध्ये एचपी रॉयल्स, सिंबा वॉरियर्स उपांत्य फेरीत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : हेमंत पाटील ग्रुप यांच्या वतीने आयोजित एचपी महिला प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत एचपी रॉयल्स, सिंबा वॉरियर्स या संघांनी आपली विजयी मालिका कायम ठेवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

व्हिजन क्रिकेट मैदान, सिंहगड रोड व डीएसके विश्व क्रिकेट मैदानावर या स्पर्धेत पहिल्या सामन्यात मुक्ता मगरे (नाबाद ४२ धावा व २-१५) हिने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर ‘सिंबा वॉरियर्स संघा’ने पुनीत बालन ग्रुप संघाचा ७ गडी राखून पराभव करत आगेकूच केली.

दुसऱ्या सामन्यात कर्णधार पूनम खेमनार (४-१८ व नाबाद २४ धावा) हिने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर एचपी रॉयल्स संघाने वॉरियर्स स्पोर्ट्स संघाचा ९ गडी राखून पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. गुुरुवारी (२८ जानेवारी) पहिल्या उपांत्य फेरीचा सामना सिंबा वॉरियर्स विरुद्ध आर्या स्पोर्ट्स यांच्यात, तर दुसरा सामना एचपी रॉयल्स विरुद्ध एचपी ग्रुप यांच्यात होणार आहे.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:

पुनीत बालन ग्रुप : २० षटकांत ७ बाद ८३ धावा पराभूत वि. सिंबा वॉरियर्स : १६.४ षटकांत ३ बाद ८७ धावा (मुक्ता मगरे नाबाद ४२, विनवी गुरव १३, माधवी आघाव १२, श्रद्धा पोखरकर १-११, आयुशी सोनी १-१८; सामनावीर-मुक्ता मगरे; सिंबा वॉरियर्स ७ गडी राखून विजयी; वॉरियर्स स्पोर्ट्स : १६.५ षटकांत सर्वबाद ६७ धावा (धनश्री भोसले १६, खुशी मुल्ला ७, सायली लोणकर ६, पूनम खेमनार ४-१८, अनुजा पाटील १-६, आदिती गायकवाड १-१, शाल्मली क्षत्रिय १-१०, दीपाली चव्हाण १-११) पराभूत वि. एचपी रॉयल्स : ७.५ षटकात १ बाद ६४ धावा (पूनम खेमनार नाबाद २४, ऋतुजा गिलबिले नाबाद २०, आदिती गायकवाड १६, संजना वाघमोडे १-१९; सामनावीर-पूनम खेमनार; एचपी रॉयल्स संघ ९ गडी राखून विजयी.

Web Title: HP Royals, Simba Warriors in the semifinals in the HP League

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.