‘एचपी’ महिला प्रीमियर लीग स्पर्धेस २२ जानेवारीपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:11 AM2021-01-21T04:11:02+5:302021-01-21T04:11:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : एचपी महिला प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धा येत्या २२ ते २९ जानेवारी दरम्यान व्हिजन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : एचपी महिला प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धा येत्या २२ ते २९ जानेवारी दरम्यान व्हिजन क्रिकेट मैदान, सिंहगड रोड व डीएसके विश्व क्रिकेट मैदान येथे होणार आहे.
कोरोना संकटकाळानंतर राज्यातील खेळाडूंना गुणवत्ता व कौशल्य दाखविण्याची संधी मिळावी याच दृष्टिकोनातून स्पर्धेचे आयोजन केले आहे. लिलावपद्धतीने संघातील खेळाडूंची निवड करण्यात आली. यात प्रियांका घोडके सर्वात महागडी खेळाडू ठरली असून तिला ७५ हजार पॉईंट्स मिळाले घेतले. त्यापाठोपाठ साक्षी कानडीला ६५ हजार पॉईंट्स मिळाले.
या स्पर्धेत भारतीय क्रिकेटपटू अनुजा पाटील, मोना मेश्राम, रिमा मल्होत्रा, स्नेहल प्रधान या आंतराष्ट्रीय खेळाडूंसह राष्ट्रीय खेळाडू २३ वर्षांखालील महाराष्ट्र संघाची कर्णधार तेजल हसबनीस, आयुषी सोनी, संजूला नाईक, शिल्पा साहू, विनवी गुरव, पूर्वजा वेर्लेकर, कीर्ती रेड्डी असे मानांकित खेळाडू स्पर्धेत खेळणार आहेत. एचपी रॉयल्स, हेमंत पाटील ग्रुप, सिम्बा वॉरियर्स, आर्या स्पोर्ट्स, वॉरियर्स स्पोर्ट्स आणि पुनीत बालन ग्रुप या ६ संघांमध्ये स्पर्धा रंगणार आहे.