हृषिकेश दातार-आकांक्षा लडकत भव्य विवाह सोहळा संपन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 06:07 AM2021-12-31T06:07:56+5:302021-12-31T07:56:42+5:30
Hrishikesh Datar-Akanksha Ladkat : हृषिकेश दातार यांनी २०१५ मध्ये दुबईतील एमिरेटस एव्हिएशन युनिव्हर्सिटीमधून बीबीएम ही पदवी प्राप्त केली व २०१६ मध्ये त्यांनी अल अदील समूहामध्ये व्यावसायिक कारकीर्द सुरू केली.
पुणे : दुबईस्थित अल अदील समूहाचे संचालक हृषिकेश दातार व आकांक्षा लडकत यांचा विवाह सोहळा नुकताच पुण्यात कोरोनाचे सर्व नियम पाळून थाटात पार पडला. हृषिकेश हे अल अदील समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांचे सुपुत्र व आकांक्षा या पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक-व्यावसायिक समीर लडकत यांच्या कन्या आहेत.
या नेत्रदीपक सोहळ्यास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, माजी आ. धनंजय माने पाटील, माजी खा. धनंजय महाडिक, पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलगुरू डॉ. भाग्यश्री पाटील, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव व गीता जाधव, डॉ. योगेश जाधव व डॉ. स्मिता जाधव यांच्याबरोबरच देश-विदेशातील उद्योजक-व्यावसायिक उपस्थित होते. दातार कुटुंबातर्फे डॉ. धनंजय दातार, वंदना दातार व रोहित दातार यांनी, तर लडकत परिवारातर्फे समीर लडकत व मानसी लडकत यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
हृषिकेश दातार यांनी २०१५ मध्ये दुबईतील एमिरेटस एव्हिएशन युनिव्हर्सिटीमधून बीबीएम ही पदवी प्राप्त केली व २०१६ मध्ये त्यांनी अल अदील समूहामध्ये व्यावसायिक कारकीर्द सुरू केली. मागील पाच वर्षांत समूहासाठी विविध ई-कॉमर्स प्रकल्प राबविण्यात त्यांनी सक्रिय योगदान दिले. त्यांच्या पत्नी आकांक्षा याही व्यवसाय व्यवस्थापन विद्याशाखेतील पदवीधर आहेत.