HSC Result 2020 : पुणे जिल्ह्यात बारावीच्या निकालामध्ये मुलींचाच दबदबा; ९५ टक्क्यांहून अधिक मुली उत्तीर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 06:46 PM2020-07-16T18:46:05+5:302020-07-16T19:12:06+5:30
जिल्ह्यात आंबेगाव तालुका अव्वल ठरला असून ९६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
पुणे : इयत्ता बारावीच्या निकालात जिल्ह्यात सर्वत्र मुलींचाच दबदबा राहिला आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह सर्व तालुक्यातील एकत्रित निकालामुळे मुलांपेक्षा मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी अधिक राहिली आहे. जवळपास सर्वच ठिकाणी ९५ टक्क्यांहून अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर दुसरीकडे सात तालुके वगळता अन्य तालुक्यांमध्ये मुलांच्या उत्तीर्णतेची संख्या ९० टक्क्यांच्या खाली आहे.
पुणे जिल्ह्याचा एकुण निकाल ९२.२४ टक्के लागला आहे. जिल्ह्यातील परीक्षा दिलेल्या १ लाख २३ हजार ६५५ विद्यार्थ्यांपैकी १ लाख १४ हजार ५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरवर्षीच्या राज्याच्या निकालात मुलीच बाजी मारतात. यंदाही हे चित्र बदललेले नसून राज्याप्रमाणेच पुणे जिल्ह्यातही मुली आघाडीवर आहेत. परीक्षेला बसलेल्या ५७ हजार १५ मुलींपैकी ५४ हजार ४३३ मुलींना यश मिळाले आहे. तर एकुण ६६ हजार ६४० मुलांपैकी ५९ हजार ६२३ मुले उत्तीर्ण झाले आहे. जिल्ह्यात आंबेगाव तालुका अव्वल ठरला असून ९६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याखालोखाल बारामती (९३.९८), शिरूर (९३.८६), जुन्नर (९३.७४), दौंड (९३.५७) या तालुक्यांचा क्रमांक लागतो. पुणे शहर पुर्व भाग व पश्चिम भागाचा निकाल ९०.३२ व ९१.३५ एवढा आहे. तर पिंपरी चिंचवडचा निकाल ९३.५३ टक्के लागला आहे.
जिल्ह्याचा विज्ञान शाखेचा निकाल ९७.५७ टक्के, कला शाखेचा ८०.८७ आणि वाणिज्य शाखेचा ९२.२० टक्के निकाल आहे. श्रेणीनिहाय गुणांमध्ये १५ हजार ८८४ विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी मिळाली आहे. तर ४४ हजार २० विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
-------------------
पुणे जिल्ह्याचा तालुकानिहाय निकाल
तालुका निकालाची टक्केवारी
पुणे शहर (पुर्व) ९०.३२
पुणे शहर (पश्चिम) ९१.३५
पिंपरी चिंचवड ९३.५३
आंबेगाव ९६
बारामती ९३.९८
भोर ९०.७६
दौंड ९३.५७
हवेली ९२.२३
इंदापुर ९३.४८
जुन्नर ९३.७४
खेड ९२.८३
मावळ ८९.११
मुळशी ९३.३३
पुरंदर ९२.८७
शिरूर ९३.८६
वेल्हा ९०.६६
एकुण ९२.२४
-------------------------
जिल्ह्याचा विद्यार्थीनिहाय निकाल
परीक्षा दिलेले उत्तीर्ण टक्केवारी
मुले ६६,६४० ५९,६२३ ८९.४७
मुली ५७,०१५ ५४,४३३ ९५.४७
एकुण १२३६५५ ११४०५६ ९२.२४
-----------------------------------------
जिल्ह्याचा शाखानिहाय निकाल
शाखा परीक्षा दिलेले उत्तीर्ण टक्केवारी
विज्ञान ४७,९३४ ४६,७७० ९७.५७
कला २१,००५ १६,९८६ ८०.८७
वाणिज्य ४९,४४५ ४५,५५८ ९२.२०
व्यवसाय ५२७१ ४७१२ ८९.३९
-----------------------
जिल्ह्याचा श्रेणीनिहाय निकाल
विशेष श्रेणी - १५८८४
प्रथम श्रेणी - ४४०२०
द्वितीय श्रेणी - ४९८५५
उत्तीर्ण श्रेणी - ४२९७
----------------------