बारावीचा निकाल आज, संकेतस्थळावर कळणार गुण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 06:33 AM2019-05-28T06:33:12+5:302019-05-28T06:33:27+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी- मार्चमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर केला जाणार आहे.
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी- मार्चमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. निकालाची ऑनलाइन प्रतही घेता येईल.
१४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी अर्ज करता येईल. अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर दिलेला आहे. गुणपडताळणीसाठी संकेतस्थळावरील गुणपत्रिकेच्या स्वसाक्षांकित प्रतीसह २९ मे ते ७ जून यादरम्यान अर्ज करता येईल. तर २९ मे ते १७ जून या काळात छायाप्रतीसाठी अर्ज करता येईल, अशी माहिती मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली. पुनर्मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळाल्यानंतर दुसºया दिवसापासून पाच दिवसांत अर्ज करता येईल.
गुणसुधारच्या २ संधी उपलब्ध आहेत. जुलै-आॅगस्ट २०१९ आणि फेब्रुवारी-मार्च २०२० या परीक्षा विद्यार्थ्यांना देता येतील.
मोबाइलवर
बीएसएनएल-धारकांनी MHHSC
संकेतस्थळावर
www.mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com