Maharashtra Winter: राज्यात हुडहुडी! येत्या २ दिवसात थंडीत आणखी वाढ होणार, जाणून घ्या आपल्या जिल्ह्याचे तापमान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 09:09 AM2024-11-25T09:09:13+5:302024-11-25T09:09:39+5:30

महाराष्ट्रात काही ठिकाणी तापमान १० अंशाच्या खाली जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे

Hudhudi will increase in the state! In the next two days, the cold will increase further | Maharashtra Winter: राज्यात हुडहुडी! येत्या २ दिवसात थंडीत आणखी वाढ होणार, जाणून घ्या आपल्या जिल्ह्याचे तापमान

Maharashtra Winter: राज्यात हुडहुडी! येत्या २ दिवसात थंडीत आणखी वाढ होणार, जाणून घ्या आपल्या जिल्ह्याचे तापमान

पुणे : राज्यात सध्या थंडीचा कडाका जाणवत असून, येत्या दोन दिवसांत किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. साधारणपणे १ ते २ अंश सेल्सिअस तापमानात घट होऊ शकते. त्यामुळे काही ठिकाणचे किमान तापमान १० अंशाच्या खाली जाण्याचा अंदाज आहे. राज्यात अहिल्यानगरमध्ये सर्वांत कमी किमान तापमान ११.७ नोंदवले गेले आहे.

राज्यामध्ये उत्तरेकडील थंड वाऱ्याच्या प्रवाहामुळे गारठा वाढत आहे. आजपासून (दि. २४) राज्याच्या किमान तापमानात १ ते २ अंशांनी चढ किंवा उतार होण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये मात्र गारठा कायम राहण्याची शक्यता आहे.

राज्याच्या किमान तापमानात चढ - उतार होत असून, शनिवारी (दि. २३) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी किमान तापमान १२-१३ अंशांवर नोंदवले गेले. त्यामध्ये अहिल्यानगर १२.४, जळगाव १२.८, नाशिक १२.९, गोंदिया १२.५ यांचा समावेश आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३० अंशाच्या खाली नोंदवला जात आहे. केवळ कोकणासह महाराष्ट्राच्या दक्षिण भागात कमाल तापमान ३० अंशांच्या पुढे जात आहे.

राज्यातील किमान तापमान

पुणे : १३.४

अहिल्यानगर : ११.७
जळगाव : १३.१

कोल्हापूर : १७.१
महाबळेश्वर : १३.९

नाशिक : १३.०
सोलापूर : १७.२

मुंबई : २२.७
नागपूर : १३.०

Web Title: Hudhudi will increase in the state! In the next two days, the cold will increase further

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.