शहरात उदंड जाहले आठवडेबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 04:18 AM2018-07-11T04:18:58+5:302018-07-11T04:19:07+5:30

शासनाच्या आदेशानुसार गेल्या दोन-अडीच वर्षांत शहराच्या विविध भागात शेतकरी आठवडेबाजार सुरू करण्यात आले आहेत.

 Huge bustling markets in the city | शहरात उदंड जाहले आठवडेबाजार

शहरात उदंड जाहले आठवडेबाजार

Next

- सुषमा नेहरकर-शिंदे
पुणे - शासनाच्या आदेशानुसार गेल्या दोन-अडीच वर्षांत शहराच्या विविध भागात शेतकरी आठवडेबाजार सुरू करण्यात आले आहेत. सध्या शहरात सुरू असलेल्या ६५ ते ७० बाजारांपैकी केवळ ८ ठिकाणी महापालिकेच्या वतीने परवानगी देण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, शासनाच्या पणन विभागाचीदेखील या शेतकरी आठवडेबाजारांना परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
शेतकऱ्यांना आपला शेतीमाल थेट ग्राहकांना विक्री करता यावी व शहरातील लोकांना ताजा भाजीपाला, फळे वाजवी दरात उपलब्ध व्होवा यासाठी शासनाने ‘संत शिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडेबाजार’ हे खास अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना अल्प दरात आपल्या परिसरात जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यानुसार महापालिकेच्यावतीने शेतकरी आठवडेबाजाराचे स्वतंत्र धोरण तयार करण्यात आले. यामध्ये शहरातील मोकळ््या जागा महापालिकेच्यावतीने आठवडेबाजारास उपलब्ध करून देण्याचे निश्चित करण्यात आले. हे धोरण ठरविताना महापालिकेच्या शाळा, मैदाने, रुग्णालयासाठी राखीव जागा बाजारासाठी न देण्याचादेखील निर्णय घेतला. त्यानुसार पणन विभागाकडून आलेल्या प्रस्तावानुसार महापालिकेच्या वतीने शहरात विविध भागांत शेतकरी आठवडेबाजारासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येतात. गेल्या दोन-अडीच वर्षांत शहरामध्ये पणन विभागाकडून आलेल्या प्रस्तावानुसार ८ ठिकाणी शेतकरी आठवडेबाजार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. सध्या शहरामध्ये ६५ ते ७० ठिकाणी शेतकरी आठवडेबाजार सुरू असल्याचे महापालिकेच्यावतीने
स्पष्ट केले. यात अनेक ठिकाणी परवानगी न घेता नगरसेवक, लोकप्रतिनिधींची शिफारसपत्रे घेऊन अनधिकृतपणे बाजार सुरू केल्याची माहिती समोर आली.

शेतकºयांच्या नावाखाली स्थानिक विक्रेत्यांचा बाजार

शेतकºयांना आपला शेतीमाल थेट ग्राहकांना विक्री करता यावा, या प्रमुख उद्देशाने शेतकरी आठवडेबाजार सुरू करण्यात आले. परंतु सध्या शहरामध्ये अनेक ठिकाणी सुरू असलेल्या शेतकरी बाजाराच्या नावाखाली स्थानिक किरकोळ विक्रेत्यांनीच बाजार उठवला असल्याचे समोर आले आहे.

तसेच शेतकरी आठवडेबाजारामध्ये आठवड्यातील एक दिवस ठराविक वेळेसाठीच ही जागा उपलब्ध करून देण्यात येणार होती. परंतु आता महिन्यांच्या तीसही दिवस हे बाजार भरत आहेत.

महापालिकेकडे ५४ प्रस्ताव प्रलंबित
शहराच्या विविध भागांत आठवडेबाजार सुरू करण्यासाठी पणन विभागाकडून महापालिकेला आतापर्यंत ५४ प्रस्ताव सादर केले आहेत.
या सर्व जागांबाबत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून मालमत्ता व बांधकाम विभागाकडून अभिप्राय मागविण्यात आला आहे. यापैकी ३ ते ४ जागांवर बाजार सुरू करण्यास परवानगी देण्यात येईल.

शहरातील आठवडेबाजाराची लवकरच तपासणी
गेल्या दोन-अडीच वर्षांत शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आठवडेबाजार सुरू झाले आहेत. यापैकी बहुतेक अनधिकृत असल्याचे समोर आले असून, शहरातील सर्वच आठवडेबाजारांचा महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने तपासणी करून याबाबत अहवाल तयार करून पणन विभागाला पाठविण्यात येणार आहे.
- माधव जगताप, अतिक्रमण विभागप्रमुख

Web Title:  Huge bustling markets in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे