गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी प्रचंड गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:10 AM2021-04-13T04:10:58+5:302021-04-13T04:10:58+5:30
पुणे : गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी नागरिकांनी मध्यवस्तीतील महात्मा फुले मंडई परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. यासोबतच मध्यवर्ती पेठा, ...
पुणे : गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी नागरिकांनी मध्यवस्तीतील महात्मा फुले मंडई परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. यासोबतच मध्यवर्ती पेठा, उपनगरांमध्येही फुलांची दुकाने, भाज्यांची दुकाने, मिठाई दुकानामध्ये गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. अनेक नागरिकांकडून यावेळी कोरोना
नियम पायदळी तुडविले गेले. तर, सुरक्षित अंतराचाही फज्जा उडाला.
दोन दिवसांच्या लॉकडाऊननंतर संपूर्ण शहरातून नागरिक घराबाहेर पडले. राज्य शासनाकडून पुन्हा लॉकडाऊन लावला जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी भाजी आणि रेशन खरेदीसाठी गर्दी केली होती. त्यातच मंगळवारी गुढीपाडवा असल्याने सणाची खरेदीही अनेकांनी केली. दोन दिवसांच्या लॉकडाऊनमुळे घराबाहेर न पडलेले नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडले. मंडई आणि आसपासच्या परिसरातून सणाचे साहित्य, फुले, हार, सजावटीचे साहित्य घेण्यासाठी झुंबड उडाली होती. पाडव्याचे साहित्य घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती उपनगरातूनही खरेदीसाठी नागरिक आलेले होते. यामध्ये दुकानदार विक्रेते यांचाही समावेश होता. याभागात झालेल्या गर्दीमुळे काही काळ वाहतूककोंडी झाली होती.