Pune Corona News: गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी मंडईत प्रचंड गर्दी, सोशल डिस्टंन्सिगचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:23 PM2021-04-12T16:23:12+5:302021-04-12T16:29:48+5:30

अनेक नागरिक विनामास्क फिरत असल्याचे चित्र

Huge crowd in the market to buy Gudipadva, fuss of social distance | Pune Corona News: गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी मंडईत प्रचंड गर्दी, सोशल डिस्टंन्सिगचा फज्जा

Pune Corona News: गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी मंडईत प्रचंड गर्दी, सोशल डिस्टंन्सिगचा फज्जा

Next
ठळक मुद्देरहदारीचा भाग असल्याने गर्दीवर नियंत्रण आणणे अशक्य

पुणे: नववर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जाणाऱ्या गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी पुण्यातील मंडईत प्रचंड गर्दी झाली आहे. त्याठिकाणी अनेक नागरिकांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केलं असून सर्वत्र सोशल डिस्टंन्सिगचा फज्जा उडवला आहे. अनेक जण तर विनामास्क फिरत असल्याचे चित्र दिसून आले आहे. 

दोन दिवसाच्या लॉकडाऊननंतर संपूर्ण शहरातून नागरिक घराबाहेर पडले आहेत. त्यातून गुढीपाडवा एक दिवसावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे मंडईसारख्या अनेक ठिकाणी पाडव्याचे साहित्य घेण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. पुण्यातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या मंडईत अनेक सणांच्या वेळी गर्दी होत असते. नागरिक याठिकाणी  उपनगरातूनही खरेदीसाठी येत असतात. मंडईच्या खरेदीबरोबरच आजूबाजूला मिठाईची दुकाने असल्याने गर्दीत मोठ्या प्रमाणावर वाढ होते. हा सर्व भाग रहदारीचा असल्याने नागरिकांच्या गर्दीला नियंत्रणात आणणे. पोलिसांसमोरील आव्हानच झाले आहे. 

पुण्यात कोरोनाची चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. पण या गर्दीतून नागरिकांना त्याचे अजिबात गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. खरेदीसाठी आलेल्या नागरिकांमुळे आजूबाजूच्या परिसराततही वाहतूककोंडी झाली आहे. तसेच सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ६ नंतर संचारबंदी असल्याने नागरिकांनी दिवसा गर्दी केली आहे. अशा परिस्थितीत विक्रेते आणि नागरिक मास्क फक्त नावालाच जवळ ठेवत आहेत. अनेकांचे तर मास्क नाकावरून घसरून गळ्याजवळ आले आहे. गर्दीमध्ये नागरिक शुद्ध हरपल्यासारखे वागू लागले आहेत.

काल दिवसभरात ६ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसागणिक हि संख्या वाढतच चालली आहे. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात लॉकडाउनच्या चर्चा चालू आहेत. कधीही लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा चिंताजनक परिस्थितीत गर्दी करून नागरिक स्वतःबरोबर दुसऱ्यांचा जीवही धोक्यात घालत आहेत.  
 

Web Title: Huge crowd in the market to buy Gudipadva, fuss of social distance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.