कुरकुंभ येथील केमिकल कंपनीला भीषण आग, तीन तासांपासून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 12:44 PM2020-05-22T12:44:24+5:302020-05-22T12:45:58+5:30
सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
कुरकुंभ : दौंड तालुक्यातील कुरकुंभएमआयडीसीतील एका केमिकल कंपनीला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागली. कुसुम डिस्टीलेशन अँड रिफायनरी प्रायव्हेट लिमिटेड असे या कंपनीचे नाव आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. या आगीचे स्वरुप इतके भीषण आहे की तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर देखील आगीवर नियंत्रण मिळविता आलेले नाही. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
कुसुम डिस्टीलेशन अँड रिफायनरी प्रायव्हेट लिमिटेड केमिकल कंपनीला ही आग शुक्रवारी(दि. २२) सकाळी सकाळी साडेदहाच्या सुमारास लागली आहे.मिथेनॉल,आय पी ये ,कॉस्टिक अश्या विविध प्रकारच्या रसायनाच्या प्रक्रीया केल्या जात होत्या. आग लागली त्या वेळेस अंदाजे पाचशे रासायनिक मोठे ड्रम आतमध्ये होते, अशी माहिती समोर येत आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून कंपनीचे मोठे नुकसान या आगीत झाल्याचे समोर येत आहे.
(सविस्तर वृत्त लवकरच)