रक्षाबंधन निमित्त प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ; पीएमपी कडून जादा बसेसचे नियोजन

By नितीश गोवंडे | Published: August 29, 2023 10:30 AM2023-08-29T10:30:36+5:302023-08-29T10:31:06+5:30

प्रवाशांनी सार्वजनिक प्रवासी वाहतूक बससेवेचा लाभ घ्यावा, असे पीएमपी प्रशासनाचे आवाहन

Huge increase in the number of travelers on the occasion of Rakshabandhan; Planning of additional buses by PMP | रक्षाबंधन निमित्त प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ; पीएमपी कडून जादा बसेसचे नियोजन

रक्षाबंधन निमित्त प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ; पीएमपी कडून जादा बसेसचे नियोजन

googlenewsNext

पुणे : रक्षाबंधन सणानिमित्त पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी ३० ऑगस्ट रोजी पीएमपी प्रशासनातर्फे दैनंदिन बस संख्येपेक्षा जादा बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दरवर्षी रक्षाबंधन निमित्त पीएमपीने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होते, यामुळे प्रवाशांची जास्तीत जास्त सोय होण्यासाठी नियमित संचलनात असलेल्या १ हजार ८३७ बसेस व्यतिरिक्त जादा ९६ बसेस अशा एकूण १ हजार ९३३ बसेसचा ताफा रस्त्यावर असणार आहे.

या जादा बसेस ह्या गर्दीच्या मुख्य बस स्थानकांवरून कात्रज, चिंचवड, निगडी, सासवड, हडपसर, वाघोली, जेजुरी, आळंदी, भोसरी, तळेगाव, राजगुरूनगर आणि देहूगांव या ठिकाणी सोडण्यात येणार आहेत. यासाठी वाहक, चालक, पर्यवेक्षकीय सेवक यांच्या साप्ताहिक सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

याव्यतिरिक्त ३१ ऑगस्ट रोजी देखील या जादा बसेसचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती पीएमपी प्रशासनातर्फे देण्यात आली. तरी जास्तीत जास्त प्रवाशांनी सार्वजनिक प्रवासी वाहतूक बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Huge increase in the number of travelers on the occasion of Rakshabandhan; Planning of additional buses by PMP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.